"खूप मेहनत करायला लागतीये...", नव्या मालिकेच्या शूटवेळी झाली दुखापत; वल्लरी विराजची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:40 IST2026-01-09T16:39:20+5:302026-01-09T16:40:15+5:30
वल्लरी विराज नव्या मालिकेबद्दल आणि भूमिकेबद्दल म्हणाली...

"खूप मेहनत करायला लागतीये...", नव्या मालिकेच्या शूटवेळी झाली दुखापत; वल्लरी विराजची प्रतिक्रिया
मराठी मनोरंजनविश्वातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री वल्लरी विराज 'शुभ श्रावणी' या नवीन मालिकेतून पुन्हा एकदा झी मराठीवर पुनरागमन करत आहे. या मालिकेत ती शिक्षणमंत्र्यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे. आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना वल्लरीने अनेक गोष्टींचा उलगडा केला. मालिकेच्या शूटला सुरुवात झाल्यानंतर काहीच दिवसात तिला दुखापतही झाली. याचाही किस्सा तिने सांगितला.
नव्या मालिकेबद्दल वल्लरी म्हणाली, "श्रावणीची भूमिका करताना खरंतर थोडसं हे आव्हानात्मक सुद्धा वाटतं कारण बऱ्याच भावनांचा मेळ ह्या भूमिकेत मला दाखवायला लागतोय. मी मुळात माझ्या वैयक्तिक आयुष्यात जशी आहे तशी श्रावणी अजिबात नाहीये आणि ते भूमिकेत मला करायला मिळतंय, जे खरंच खूप छान आहे आणि मला त्याची मज्जा येतीये. प्रेक्षकांनाही माझी ही वेगळी बाजू श्रावणीच्या भूमिकेतून पाहायला आवडेल, ह्याची मला खात्री आहे. प्रेक्षकांचा पहिल्या प्रोमो पासून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रोमो मध्ये माझा चेहरा दिसत नव्हता तरीही प्रेक्षकांनी ओळखलं कि हि वल्लरी आहे, तो खूपच सुखद अनुभव होता माझ्यासाठी. प्रेक्षकांचं आजही तेवढंच प्रेम मिळतंय, ते खूप मेसेज करतायत, कंमेंट्स करतायत, मला टॅग करतायत, सगळेच म्हणतायत आम्ही वाट बघत होतो कि तू कधी परत येतेस. ह्या सगळ्याने खूपच छान, वाटतंय, पण ह्याने जबाबदारी हि वाढलीय, आता ह्याची सुद्धा जाणीव होतेय. त्यामुळे थोडस दडपण हि आहे कि आता जास्त चांगलं काम करायचंय. मी प्रेक्षकांच्या अपेक्षांना खर उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे.
आमच्या टीम बद्दल सांगायचे झालं तर आमच्या मालिकेची टीम खूपच मस्त आहे, लोकेश गुप्तेजी माझ्या वडिलांच्या भूमिकेत आहेत, आसावरी जोशी माझ्या आत्याचं काम करतायत. असं माझं कुटुंब आहे आणि त्यांच्या सोबत माझं खूप छान जमत. मधल्या वेळेत आम्ही गप्पा मारतो, काही ना काही थट्टा मस्करी करतो, काही ना काही आमचं सेटवर चालू असत. आधीच्या मालिकेतल्या सानिका काशीकर आणि भुमीजा पाटील ह्या पुन्हा माझ्यासोबत ह्या मालिकेत आहेत त्यामुळे आम्हा तिघीना तर खरंच खूप छान वाटतय आम्ही तिघी परत एकत्र काम करणार ह्याचा आम्हाला अधिक आनंद आहे.शूटिंग दरम्यानचा काही किस्सा सांगायचं झालं तर, ह्या मालिकेत जो मुख्य अभिनेता आहे सुमित पाटील त्याच आणि माझं पण पहिल्या दिवसापासूनच खूप छान भूमिका जमून आली आहे, त्याच्या सोबत हि शूट करताना खूप मज्जा येतेय, त्याचे आणि माझे थोडे असे हलके फुलके, टॉम अँड जेरी सारखे सीन असतात त्यामुळे धमाल येते काम करताना. आमचं प्रोमोचं शूटिंग आणि मालिकेच्या काही सीन्सच शूटींग हे कोल्हापूरला होत, आम्ही सगळे कलाकार तिथेच भेटलो.
अजून एक किस्सा सांगायचा झाला तर शूटिंग सुरु झाल्यावर माझ्यासोबत एक अपघातही झाला ज्यात माझ्या खांद्याला दुखापत झाली आणि तुम्ही माझ्या सोशल मीडियावर पहिलेच असेल मी हाताला पट्टी बांधली आहे. प्रेक्षकांना काळजी करण्यासाठी कारण नाही कारण मी रिकव्हरी करत आहे, सेटवर माझी खूप काळजी घेतली जात आहे. मला तुम्हाला भेटण्याची इतकी उत्सुकता लागून राहिली आहे कि मी लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून आम्ही सर्व जण काळजी घेत आहोत.