Bigg Boss Marathi 3 : "BigBossची चावडीच double ढोलकी"; उत्कर्षसाठी आदर्श शिंदेंची 'खास' पोस्ट, घेतली बिग बॉसचीच शाळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 02:59 PM2021-10-04T14:59:41+5:302021-10-04T15:53:06+5:30

Bigg Boss Marathi 3 And Adarsh Shinde : उत्कर्षचा भाऊ आदर्श शिंदे (Adarsh Shinde) यांनीच बिग बॉस मराठीची शाळा घेतली आहे.

Utkarsh Shinde Brother Adarsh shinde Slams bigg boss marathi 3 Over chavadi | Bigg Boss Marathi 3 : "BigBossची चावडीच double ढोलकी"; उत्कर्षसाठी आदर्श शिंदेंची 'खास' पोस्ट, घेतली बिग बॉसचीच शाळा 

Bigg Boss Marathi 3 : "BigBossची चावडीच double ढोलकी"; उत्कर्षसाठी आदर्श शिंदेंची 'खास' पोस्ट, घेतली बिग बॉसचीच शाळा 

googlenewsNext

मुंबई - "बिग बॉस मराठी 3"च्या (Bigg Boss Marathi 3) चावडीवर महेश मांजरेकर यांनी पुन्हा एकदा स्पर्धकांची शाळा घेतली. गेल्या आठवड्यात रंगलेल्या हल्लाबोल टास्कदरम्यान बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये वेगवेगळे वाद झालेत. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी रंगलेल्या स्पेशल एपिसोडमध्ये महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांची वागणूक आणि त्यांनी केलेल्या चूका यावर अनेकांची खरडपट्टी काढली. मांजरेकरांनी उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) याचीही कानउघडणी केली. तू आत्तापर्यंतचा घरातील सर्वात वाईट संचालक होतास, असे ते म्हणाले. तसेच त्याआधी त्यांनी उत्कर्षला 'डबल ढोलकी' असंही म्हटलं. यानंतर आता उत्कर्षचा भाऊ आदर्श शिंदे (Adarsh Shinde) यांनी बिग बॉस मराठीची शाळा घेतली आहे. "BigBoss ची चावडीच double ढोलकी" असल्याचं म्हटलं आहे. 

आदर्श शिंदे (Adarsh Shinde) यांनी आपल्या भावासाठी एक खास फेसबुक पोस्ट लिहिली आहे. सध्या सोशल मीडियावर याचीच जोरदार चर्चा रंगली आहे. यामध्ये त्यांनी मतं मांडली असून "Double Dholki कोण? Favouritism कोण करतंय? हा भेद भाव कशासाठी? जरा भान असू द्या… जसा खेळ पूर्ण महाराष्ट्र बघतोय तशी चावडी ही संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. तर fair तुम्ही पण खेळा" असं म्हटलं आहे. फेसबुक पोस्टमध्ये "मी आज माझी आणि माझ्या वर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांची मतं माझ्या चावडीत मांडणार आहे. चला सरळ मुद्द्यावर बोलेन. सुरुवातीला “उत्कर्ष शिंदे” याचे विचार “विशाल” या स्पर्धका सोबत पटत नव्हते, तरीही त्याने विशालचा वापर captaincy task साठी केला, तर याचा राग चावडीला आला आणि उत्कर्ष double game खेळतोय म्हणजेच “डबल ढोलकी” आहे असा अर्थ काढण्यात आला. मित्रांनो, हा खेळ सुरुवातीला एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाण्याचाच खेळ आहे कारण काही tasks तसेच आहेत जे group ने खेळावे लागतात" असं म्हटलं आहे. 

"हे काड्या लावायचं काम कोण करतंय?"

"विशालने captaincy Task मधे उत्कर्ष यांना मदत केली म्हणून उत्कर्षनीही परतफेड म्हणून विशालला Nomination प्रक्रियेत त्याच्या नावाची पाटी न तोडता म्हणजेच nominate न करता safe ही केलं आणि ते विशालच्या नंतर लक्षात ही आलं. पण चावडीला हा fair game दिसला नाही? आणि काही प्रेक्षाकांना ही कळावं म्हणून सांगतोय की BigBoss च्या घरात मला चावडी पण double dholkich दिसते. कारण आता खेळच double dholki झालाय. चावडीनेच A Team आणि B team पाडून, team चा task दिला. तुम्ही team साठी पण खेळा आणि individually पण खेळा हे सांगणारी पण चावडीच. म्हणजेच खेळणारे सगळे स्पर्धक double dholkich होणार कारण ते एकमेकांमधे पुढे जाण्यासाठी काड्याच लावणार आणि हे काड्या लावायचं काम कोण करतंय? तर हे सांगायची गरज नाही."

"double dholki कोण? हे चावडीला दिसत नाही? या वर बोलणार कोण?"

"तुम्ही पाहिलं असेल तर Nomination प्रक्रियेत विशाल आणि विकास या दोघांना वाटलं की उत्कर्षने आपली पाटी तोडून आपल्याला Nominate केलं, पण त्यांना nominate केलं होतं त्यांच्याच विशवासातल्या दादूस आणि तृप्तीने… इथे double dholki कोण झालं? पहिला Captain झाल्यानंतर उत्कर्ष शिंदे याने सगळ्या स्पर्धकांना सांगितल्याप्रमाणे ज्यांना जी कामे हवी होती तीच दिली आणि हे सगळ्या स्पर्धकांनी मागच्या चावडीला कबूल ही केलं.. (चावडीनेच तो video पुन्हा बघावा) मग आता उत्कर्ष “Captain” म्हणून biased कसा? B team मधला “विकास” त्यांच्याच team मधल्या मीनल आणि अविष्कारला सांगतो की विशालच्या शक्तीचा वापर आपण task मधे करुन घ्यायचा, बाकी त्याला काही डोकं लाऊ द्यायचं नाही,  तो त्याच्या मतांवर ठाम नहीये आणि तो आता वेगळा वागतोय… इथे double dholki कोण झालं? आणि विकास त्यांच्याच team मधला एखादा स्पर्धक नसला तर त्याच्या विरोधात बोलत बसतो आणि B team मधले सगळे ऐकत बसतात इथे ही double dholki कोण? हे चावडीला दिसत नाही? या वर बोलणार कोण?"

"Sympathy गोळा करायला आलात की खेळायला?"

"B team ला फक्त खेळात powder मिळाली नाही म्हणून game fair झाला नाही आणि ते task हरले असं चावडीला ही वाटतं. एका point ला B team स्वतः म्हणाली की, करण्यासारखं भरपूर होतं task मधे, पण आम्ही केलं नाही , कारण काहीही टाकलं तरी जय आणि गायत्री उठणार नव्हते हे दिसत होतं आणि त्यामुळे B team ने खेळणं ही सोडून दिलं होतं. मित्रांनो, खेळून हरले असते तर माझ्या मनात नक्कीच त्यांनी जागा निर्माण केली असती पण खेळलेच नाहीत तरीही चावडी म्हणते माझ्यासाठी B team जिंकली? अरे B team थकली खेळात आणि त्यांना कळलं की हे काहीही केल्या त्या bike वरुन उतरणार नाहीत  कारण जय आणि गायत्री ची startegy जबरदस्त होती खेळात. खेळ strategy चा आहे की रडायचा आणि give up करून sympathy मिळवायचा? कारण रडणाऱ्यांनाच प्रेम मिळतंय आणि खेळणारे वेडे ठरतायत का? घरात प्रत्येकाला वाटत असतं की ते fair खेळताएत. Sympathy गोळा करायला आलात की खेळायला? हे का निदर्शनास आणून दिलं नाही?"

"उत्कर्ष खरं बोलतोय की खोटं याची शाहनिशा चावडीने करायला पाहिजे होती"

"इथे double dholki चावडी दिसते. Biggboss हा main म्हणजे task oriented show आहे. पण त्यात taskच give up करणाऱ्या team ला फार कोणी काही बोलत नाही. Fair- unfair चा मुद्दा योग्य आहे पण त्यासाठी task तर खेळा ! काही मुद्दे बरोबर मांडले गेले ,उत्कर्ष संचालक होता आणि तो म्हणाला की मिरचीचं पाणी खेळात वापरलं गेलं त्यावर त्याने ती बाटली ही दखावली ज्यात ते पाणी भरुन वापरलं होतं कारण त्यातून मिरचीचा वास येत होता…उत्कर्ष खरं बोलतोय की खोटं याची शाहनिशा चावडीने करायला पाहिजे होती आणि मग कोण चुकीचं हे ठरवायला पाहिजे होतं… A team ने मिरचीची धुरी वापरली ते चुकलं कारण त्याचा त्रास नक्कीच झाला असता पण उत्कर्षचीच team असल्यामुळे त्याने धुरी नका वापरू हे सांगितल्यावर ते लगेच ऐकलं गेलं. त्यामुळे  त्याला ठणकाऊन सांगायची गरज पडली नाही आणि ती गोष्ट तिथेच थांबली याची दखल घेतली गेली नाही…. हे चावडीला दिसलं नाही का?"

"विकास unfair नाही का वाटत चावडीला?"

"Individually खेळायला सगळ्यांना आवडेल individual task तर द्या! Task group मधे येतायत मग group साठी खेळल्यावर individual दिसत नाही असं सांगून biggboss स्पर्धकांसोबत जो doubleढोलकीपणा करतायत त्याचं काय? Captaincy च्या task मधे जय ला मिळालेली मतं त्याने गायत्री ला देणं चुकीचं होतं तर दर फेरी मधे फेरी संपल्याचा biggboss ने buzzer वाजवल्यानंतर B team च्या स्पर्धकांनी आपली पाटी देणं कितपत बरोबर होतं? खऱ्या आयुष्यात मतदानाचा कालावधी संपल्यानंतर केंद्रावर जाताही येत नाही... मग इथे संचालक विकास unfair नाही का वाटत चावडीला? फेरी संपल्याचा Buzzer झाल्या नंतरची मतं ग्राह्य कशी? कोल्हापूरची एक स्पर्धक आहे आणि कोल्हापूर मधे #Bigbossचे viewers जास्त असतील मान्य आहे म्हणून चावडी म्हणाली ती स्पर्धक कोल्हापूरची आहे तर ती “माज”करेल आणि का तर कोल्हापूर चावडीची favourite आहे? महाराष्ट्रातलं एक एक गाव आणि शहर माझं ही favourite आहे कारण आम्हाला अख्या महाराष्ट्रानं प्रेम दिलंय फक्त कुठल्या एका गावानेच नाही….#Bigboss अख्या महाराष्ट्रात पाहिला जाणारा show आहे कारण तो “मराठी bigboss” आहे. का कुठल्या एका गावचा स्पर्धक आपल्या शहराचा “माज” करेल? अभिमान असायलाच पाहिजे आपल्या गावाचा किंवा शहराचा."

"चावडी ही संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. तर fair तुम्ही पण खेळा"

"मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे, माझ्या सोलापूरचा माझ्या मंगळवेढा गावाचा ही अभिमान आहे. माझ्या गावाला संतांची भूमी म्हटलं जातं म्हणून काय मी माज करायचा? सोलापुरातल्या स्पर्धकाने माज करु नये का? पुण्यातल्या स्पर्धकांचं काय? मुंबईतल्या? तुम्ही माज दाखवायला आलात की खेळायला? Double Dholki कोण? Favouritism कोण करतंय? हा भेद भाव कशासाठी? जरा भान असू द्या… जसा खेळ पूर्ण महाराष्ट्र बघतोय तशी चावडी ही संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. तर fair तुम्ही पण खेळा. जे चुकतंय ते सांगाच पण जे चांगलं करतायत ते ही सांगा.. biased चावडी नको... निव्वळ माझा भाऊ आहे म्हणून मी हा कार्यक्रम बघतो. काही गोष्टी खटकल्या आणि आमच्या ही मित्रांचे आणि fans चे followers चे सतत calls आणि messeges येत आहेत की दादा तुम्ही बोला तुम्ही शांत का? जे घडतंय ते चुकिचं घडतंय असं प्रेक्षकांना ही वाटतंय.  त्यामुळे ठरवलं की काही मुद्दे मांडूया आणि हे सगळं लिहावसं वाटलं… उत्कर्ष शिंदे खेळायला गेलाय, रडून sympathy मिळवायला नाही. माझा भाऊ प्रत्येक criticism gracefully घेतोय याचा मला अभिमान आहे. A आणि B मधे भेद भाव करूननका आणि प्रेक्षकांची दिशाभूल करू नका" असं आदर्श शिंदे यांनी म्हटलं आहे. 


 

Web Title: Utkarsh Shinde Brother Adarsh shinde Slams bigg boss marathi 3 Over chavadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.