'नजर'मध्ये उर्वशी ढोलाकिया साकारणार खलनायकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 11:24 IST2018-07-12T11:21:03+5:302018-07-12T11:24:09+5:30

स्टारप्लसवरील आगामी मालिका 'नजर' हे या मालिकेत दिसणार. या मालिकेच उर्वशी ढोलकिया चेटकीणीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Urvashi Dholakia will be seen in the negative roll | 'नजर'मध्ये उर्वशी ढोलाकिया साकारणार खलनायकी

'नजर'मध्ये उर्वशी ढोलाकिया साकारणार खलनायकी

ठळक मुद्दे उर्वशी पुन्हा एकदा एका नवीन खलनायकी भूमिकेत दिसणार आहे'कसौटी जिंदगी की' या मालिकेत उर्वशीने कोमोलिका ही भूमिका साकारली होती

स्टारप्लसवरील आगामी मालिका 'नजर' हे या मालिकेत दिसणार. या मालिकेच उर्वशी ढोलकिया चेटकीणीच्या भूमिकेत दिसणार आहे.  निर्मात्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले की, “उर्वशी ढोलाकियाची स्क्रीन उपस्थिती एक खलनायिका म्हणून अतिशय जबरदस्त आहे. कोमोलिकाची तिची भूमिका प्रेक्षकांना अतिशय आवडली आणि तिचे त्यासाठी खूप कौतुक झाले. त्यामुळे साहजिकच निर्मात्यांसाठी ती प्रथम पसंती होती आणि तिची निवड यासाठी करण्यात आली. 

प्रेक्षकांना उर्वशी पुन्हा एकदा एका नवीन खलनायकी भूमिकेत छोट्‌या पडद्यावर दिसून येणार असून हा शो आपल्या स्पेशल इफेक्ट्‌स आणि भयावह पार्श्वसंगीतासह प्रेक्षकांना थक्क करेल.'कसौटी जिंदगी की' या मालिकेत उर्वशीने कोमोलिका ही भूमिका साकारली होती. या भूमिकेला निगेटिव्ह शेड्स होत्या. विशेष म्हणजे उर्वशीच्या या मालिकेतील अभिनयासह तिची स्टाईलसुद्धा प्रसिद्ध झाली होती. कोमोलिका लूक रसिकांना चांगलाच भावला होता. 'कसौटी' मालिकेनंतर तिने 'घर एक मंदिर', 'कभी सौतन कभी सहेली' अशा मालिकांमध्ये काम केलं.'बिग बॉस' या रियालिटी शोमध्येही ती झळकली.मात्र 'चंद्रकांता' या मालिकेतून ख-या अर्थाने तिचे कमबॅक झाले. वयाच्या सहाव्या वर्षापासून तिने अभिनयाला सुरुवात केली. लक्स साबणाच्या जाहिरातीमुळे तिला छोट्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली.वयाच्या आठव्या वर्षी 'वक्त की रफ्तार' या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली.विविध मालिका आणि सिनेमांमध्ये तिने बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत.'देख भाई देख' आणि 'शक्तीमान' अशा मालिकांमध्येही उर्वशीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली.  तिला खरी ओळख मिळवून दिली ती 'कसोटी जिंदगी'च्या कोमोलिकानेच.वयाच्या 17व्या वर्षीच ती दोन मुलांची आई बनली. 38 वर्षीय उर्वशीने आई आणि वडिल अशा दोन भूमिका मोठ्या निभावत क्षितीज तसंच सागर या आपल्या मुलांचं पालनपोषण केलं आहे. 

Web Title: Urvashi Dholakia will be seen in the negative roll