या अभिनेत्रीच्या फोटोची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा, काहीच तासांत मिळाले हजारोहून अधिक लाईक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 16:31 IST2021-01-20T16:30:21+5:302021-01-20T16:31:03+5:30

या अभिनेत्रीने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Urmila nimbalkar shares picture on instagram, fans liked it | या अभिनेत्रीच्या फोटोची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा, काहीच तासांत मिळाले हजारोहून अधिक लाईक्स

या अभिनेत्रीच्या फोटोची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा, काहीच तासांत मिळाले हजारोहून अधिक लाईक्स

ठळक मुद्देउर्मिला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून या फोटोची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

उर्मिला निंबाळकर ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री असून विविध मालिकांमध्ये तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. दिया और बाती, मेरी आशिकी तुमसे ही या मालिकेत तिनं काम केलं आहे. उर्मिलाची छोट्या पडद्यावरील 'दुहेरी'ही मालिका चांगलीच गाजली होती. 

उर्मिला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून या फोटोची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या फोटोत तिने छानसी साडी नेसली असून त्याला साजेसे दागिने परिधान केले आहेत. या फोटोसोबत डोळे बोलतात... बंद केले तरीही... असे तिने कॅप्शन लिहिले आहे. या फोटोमधील उर्मिलाचा अंदाज, तिच्या चेहऱ्यावरचे भाव सगळे काही तिच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहेत. तुझा लूक किलर आहे असे तिचे फॅन्स तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. तसेच या फोटोसोबत असलेल्या कॅप्शनचे देखील ते कौतुक करत आहेत. हा फोटो उर्मिलाने शेअर करून केवळ सहा तास झाले आहेत. पण या सहा तासात तिच्या या फोटोला ११ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

उर्मिलाने पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर फॅशन डिझायनरचं शिक्षणही तिनं घेतलं आहे. अभिनयाबरोबरच ती ट्रव्हलिंग आणि इतर विषयावरील व्हिडिओ ब्लॉग करते. तिने एक तारा, हायवे आणि सनई चौघडे यांसारख्या चित्रपटात देखील काम केले आहे. उर्मिला नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉट अँड बोल्ड फोटो पोस्ट करत असते. तिच्या या फोटोला नेहमीच तिच्या फॅन्सची पसंती मिळते.

Web Title: Urmila nimbalkar shares picture on instagram, fans liked it