पुन्हा एकदा टॉपलेस झाली Urfi Javed, वेणीनं झाकलं अंग, नेटिझन्स म्हणाले - डायन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 19:29 IST2023-01-18T19:28:08+5:302023-01-18T19:29:03+5:30
Urfi Javed : बिग बॉसची माजी स्पर्धक आणि टीव्ही मालिका अभिनेत्री उर्फी जावेदने अलीकडेच सोशल मीडियावर तिचे टॉपलेस व्हिडीओ शेअर करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुन्हा एकदा टॉपलेस झाली Urfi Javed, वेणीनं झाकलं अंग, नेटिझन्स म्हणाले - डायन...
टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सतत चर्चेत येत असते. ती चित्रविचित्र ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत येते. इतकेच नाही तर तिच्या विचित्र फॅशन स्टेटमेंटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्यावर टीका होत असतानाही त्याचा तिच्यावर काहीच परिणाम होताना दिसत नाही. याउलट ती चर्चेत येण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही आहे. तिने अलीकडेच इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट व्हिडीओ शेअर करून इंटरनेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. उर्फी जावेदने पुन्हा एकदा तिचे टॉपलेस व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अंगाभोवती लांब वेणी गुंडाळून पोज देताना दिसते आहे.
जोरदार टीका होत असताना अभिनेत्री उर्फी जावेदने पुन्हा एकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना चकीत केले आहे. उर्फी जावेदचे हे फोटो पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. यात ती टॉपलेस झाली आहे. यात तिने अंग वेणीनं झाकले आहे. यात ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसते आहे.
हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना स्टार प्लसवर प्रसारित होणाऱ्या 'नजर' या मालिकेची आठवण झाली. ज्यामध्ये अभिनेत्री मोनालिसाही लांब वेणी घालून जादूटोणा करताना दिसली होती. ती लेटेस्ट फोटोंमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या ड्रेस सेन्सवरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.