उर्फी जावेद आता 'गीता भारद्वाज'? इस्लाममधून बहिष्कृत केल्याच्या दाव्यावर अभिनेत्रीने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 12:15 IST2026-02-02T12:08:12+5:302026-02-02T12:15:38+5:30

फॅशन जगतात सध्या एकच नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे, ते म्हणजे उर्फी जावेद . अतरंगी पण तेवढाच बोल्ड लूक अशा ...

Urfi Javed Islam Expelled Geeta Bhardwaj Name Change Rumors Faizan Ansari Video | उर्फी जावेद आता 'गीता भारद्वाज'? इस्लाममधून बहिष्कृत केल्याच्या दाव्यावर अभिनेत्रीने दिली माहिती

उर्फी जावेद आता 'गीता भारद्वाज'? इस्लाममधून बहिष्कृत केल्याच्या दाव्यावर अभिनेत्रीने दिली माहिती

फॅशन जगतात सध्या एकच नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे, ते म्हणजे उर्फी जावेद . अतरंगी पण तेवढाच बोल्ड लूक अशा अनेक गोष्टींमुळे ती दररोज चर्चेत असते. कधी सेफ्टी पिन्स, कधी ब्लेड तर कधी अगदी गोणपाट वापरुन तिने तिचे बोल्ड आउटफिट तयार केलेत. अभिनेत्रीच्या फॅशन सेन्सचे जेवढे कौतुक होते, त्याहून जास्त तिच्यावर टीका होते.  उर्फी जावेद पुन्हा एकदा एका गंभीर वादामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच एका इन्फ्लुएन्सरने दावा केला आहे की अभिनेत्रीला इस्लाममधून बाहेर काढण्यात आले आहे, त्यानंतर तिचे नाव गीता भारद्वाज झाले आहे. आता अभिनेत्रीने या दाव्यांवर स्पष्ट उत्तर दिले आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत उर्फीने स्पष्ट केले की, ती कोणत्याही धर्माचे पालन करत नाही. उर्फी म्हणाली, "मी स्वतः खूप पूर्वीच धर्म सोडला आहे. हे लोक अफवा का पसरवत आहेत? मी कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही, मी नास्तिक आहे. मग तुम्ही मला अशा ठिकाणाहून कसं काय बहिष्कृत करू शकता, जिथे मी मुळात अस्तित्वातच नाही?".  तसेच तिने तिचे नाव बदलल्याच्या बातम्यांचाही पूर्णपणे नाकारल्या.

३१ जानेवारी रोजी फैजान अन्सारीने एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, उर्फी जावेदने आपल्या कपड्यांमुळे आणि वक्तव्यांमुळे मुस्लिम समुदायाचे नाव खराब केले आहे. अन्सारीने व्हिडीओमध्ये दावा केला, "उर्फी कुराण आणि इस्लामवर विश्वास ठेवत नाही, त्यामुळे आम्ही मुस्लिमांनी तिला समुदायातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. मी मौलानांना पत्र देऊन कळवले आहे की, आजपासून तिचे नाव 'गीता भारद्वाज' असेल. कोणीही तिला उर्फी जावेद म्हणू नका". अन्सारीने हे पत्र सोशल मीडियावर ट्विट देखील केले. तर उर्फीने अन्सारीच्या दाव्यांना 'निराधार' आणि 'पब्लिसिटी स्टंट' म्हटले आहे.

Web Title : उर्फी जावेद ने धर्म से निष्कासन, नाम बदलने के दावों का खंडन किया।

Web Summary : उर्फी जावेद ने इस्लाम से निष्कासित होने या गीता भारद्वाज के रूप में अपना नाम बदलने से इनकार किया। उसने नास्तिक होने की पुष्टि की और सोशल मीडिया इन्फ्लुएंसर के वीडियो वायरल होने के बाद दावों को पब्लिसिटी स्टंट बताया।

Web Title : Urfi Javed clarifies claims of religious expulsion, name change.

Web Summary : Urfi Javed denies being expelled from Islam or changing her name to Geeta Bharadwaj. She affirms her atheism and dismisses claims as a publicity stunt after a social media influencer's video went viral.