पिछे तो देखो! उर्फी जावेदची अतरंगी फॅशन; नेटकरी म्हणतात, 'आधी वाटलं सुधरली पण मागे बघितलं तर ...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 16:55 IST2023-02-06T16:53:49+5:302023-02-06T16:55:11+5:30
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि तिचे विचित्र कपडे हे जणू समीकरणच झाले आहे.

पिछे तो देखो! उर्फी जावेदची अतरंगी फॅशन; नेटकरी म्हणतात, 'आधी वाटलं सुधरली पण मागे बघितलं तर ...'
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि तिचे विचित्र कपडे हे जणू समीकरणच झाले आहे. अंग झाकलेले, जरा बरे कपडे उर्फीने घातले तर नवलच. तिला कितीही ट्रोल केले तरी फरक पडत नाही उलट ती हवे तसेच कपडे घालते. तिची फॅशन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे यातील तिचा ड्रेस बघून तुम्हीही नक्कीच गोंधळात पडाल.
उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'its over' असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे. यामध्ये उर्फीने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. त्याला काळ्या रंगाची रिबिन आहे. तर काळ्या रंगाचा स्कर्ट घातला आहे. हे सगळं व्यवस्थित वाटत असतानाच जेव्हा आरशावर कॅमेरा फिरतो तेव्हा दिसते की हे सर्व बॅकलेस आहे. म्हणजे इथेही उर्फीने तिची फॅशन दाखवली आहे.
या व्हिडिओवर कमेंट्सचा भडिमार सुरु आहे.आधी वाटलं ही सुधरली पण ३ सेकंदांनंतर हिनेच सांगितलं मी उर्फी आहे सुधरणार नाही अशी कमेंट एकाने केली आहे. ही कधी कोणता ड्रेस घालेल याचा नेम नाही असं एकाने म्हणले आहे.