'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतल्या शेफालीची बहिण आहे प्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे ती ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 09:00 IST2021-09-06T09:00:00+5:302021-09-06T09:00:00+5:30

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे सारखे प्रसिद्ध चेहरे झळकत आहेत.सुरुवातीपासून मालिकेने रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. मालिका सुरु झाल्यापासून रसिकांचे भरघोस मनोरंजन करत आहेत.

Unknown Facts Mazhi Tuzhi Reshimgaath Character Shefali's Sister Is Also Famous Actress | 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतल्या शेफालीची बहिण आहे प्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे ती ?

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतल्या शेफालीची बहिण आहे प्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे ती ?

डॉ. बी. आर. आम्‍बेडकर' मालिका झपाट्याने लोकप्रियतेच्‍या शिखरावर पोहोचली आहे आणि अल्‍पावधीतच प्रेक्षकांमध्‍ये लोकप्रिय ठरली आहे. मालिकेने हिंदीमध्ये  पहिल्‍यांदाच भारताचे प्रेरणादायी नेते डॉ. बी. आर. आंबेडकर यांची अभूतपूर्व कथा सादर करत भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत बहुतेक सर्वच मराठी कलाकारांना अभिनयाची संधी देण्यात आली आहे. 


मालिकेत  स्नेहा काटे शेलार अभिनेत्रीने जिजाबाईची भूमिका साकारत रसिकांची पसंती मिळवली आहे. या मालिकेव्यतिरिक्त स्नेहाने मराठी मालिकेतही झळकली आहे.

 

'स्वराज्यजननी जिजाबाई', 'प्रेमा तुझा रंग कसा', 'बाय बाय बायको', 'गर्ल्स हॉस्टेल', 'दुनियादारी फिल्मी इश्टाईल' अशा अनेक मालिका तसेच नाटकांमधून तिच्या भूमिकांना रसिकांनी पसंती दिली होती. 

स्नेहाप्रमाणे तिची बहिणदेखील अभिनेत्री आहे. इंडस्ट्रीत दोन्ही बहिणींनीनी आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत शेफालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहाची लहान बहीण आहे. काजल काटे असे तिच्या बहिणीचे नाव आहे. सध्या शेफालीच्या भूमिकेत काजल झळकत आहे.

शेफालीच्या भूमिकेत काजल चांगलाच धुमाकुळ उडवून देत असल्याचे पाहायला मिळते आहे. दोन्ही बहिणींना कॉलेजमध्ये शिकत असतानाच अभिनयाची आवड निर्माण झाली होती. हळूहळू दोघांनी अभिनयाला सुरुवात केली आणि आज दोघी बहिण इंडस्ट्रीत प्रसिद्ध झाल्या आहेत.

अभिनयाप्रमाणे सौंदर्यावरही रसिक फिदा होतात. दोघी तितक्याच सुंदर दिसतात. ऑनस्क्रीन लूक प्रमाणे त्यांचे ऑफस्क्रीन लूकलाही प्रचंड पसंती मिळते. सोशल मीडियावरही त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्यांचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला त्यांचे विविद अंदाज पाहायला मिळतील. त्यांचा प्रत्येक अंदाज त्यांच्या चाहत्यांसाठी खास असतो.


'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे सारखे प्रसिद्ध चेहरे झळकत आहेत. सुरुवातीपासून मालिकेने रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. मालिका सुरु झाल्यापासून रसिकांचे भरघोस मनोरंजन करत आहेत. मुख्य कलाकारांप्रमाणे इतर कलाकारांच्याही भूमिकेने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

Web Title: Unknown Facts Mazhi Tuzhi Reshimgaath Character Shefali's Sister Is Also Famous Actress