'वेल डन भाल्या' कलाकारांची अनोखी होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2016 10:35 IST2016-03-24T17:35:28+5:302016-03-24T10:35:28+5:30

होळी हा सण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जातो. पण सध्या दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे मराठी इंडस्ट्रीतील सर्व कलाकारांनी डोण्ट वेस्ट ...

Unique Holi artiste of 'Wele Dan Bhalai' | 'वेल डन भाल्या' कलाकारांची अनोखी होळी

'वेल डन भाल्या' कलाकारांची अनोखी होळी

ळी हा सण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जातो. पण सध्या दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे मराठी इंडस्ट्रीतील सर्व कलाकारांनी डोण्ट वेस्ट वॉठर म्हणत, सामाजिक संदेशाची होळी साजरी केली. त्याप्रमाणेच आगामी चित्रपट 'वेल डन भाल्या' या चित्रपटातील कलाकारांनी देखील अनिष्ट रुढींचे दहन करत इको फ्रेंडली अशी अनोखी होळी साजरी केली. 'वेल डन भाल्या' या चित्रपटात खेळणं आणि जगणं यांचा मेळ घालणाºया भाल्या नावाच्या धाडसी मुलाच्या जिद्दीची कथा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. जिद्दीने पेटून उठलेल्या भाल्याची, ध्येयवेडी प्रवासाची ही कहाणी सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. नितीन कांबळे दिग्दर्शित 'वेल डन भाल्या' या चित्रपटात रमेश देव, संजय नार्वेकर, अलका कुबल, मिताली जगताप, गणेश यादव, शरद पोंक्षे, संजय खापरे, अंशुमाला पाटील राजेश कांबळे, अंशुमन विचारे, नम्रता जाधव, गॅरी टँटनी या कलाकारांचा समावेश आहे. तर बालकलाकार म्हणून नंदकुमार सोलकर, सौरभ करवंदे पाहायला मिळतील.

Web Title: Unique Holi artiste of 'Wele Dan Bhalai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.