अनोळखी सुधीर - रेवती आयुष्याच्या उत्तरार्धात होतील का जन्माचे सोबती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 09:55 IST2018-03-21T04:25:44+5:302018-03-21T09:55:44+5:30
झी युवावर सोमवारी आणि मंगळवारी दाखवण्यात येणारी गुलमोहर ही मालिका लोकप्रिय होत आहे. एका गोष्टीचे केवळ दोन भागात चित्रीकरण ...
अनोळखी सुधीर - रेवती आयुष्याच्या उत्तरार्धात होतील का जन्माचे सोबती?
झ युवावर सोमवारी आणि मंगळवारी दाखवण्यात येणारी गुलमोहर ही मालिका लोकप्रिय होत आहे. एका गोष्टीचे केवळ दोन भागात चित्रीकरण करून वेगवेगळ्या हृदयस्पर्शी कथा सांगणारी गुलमोहर ही मालिका सध्या सगळ्यांचीच आवडती झाली आहे.
योग्यवेळी आपला जोडीदार निवडून त्याच्यासोबत सुखाचा संसार करणं आणि आपल्या त्याच जोडीदाराची साथ आपल्याला आयुष्याच्या शेवटपर्यंत मिळणं, ही सगळ्यांची इच्छा असते. काही लोक मात्र याला अपवाद ठरतात. मुलाबाळांचं सगळं स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा एकमेकांसाठी उरलेले "ते दोघे" जर वेगळे झाले तर सगळ्यात जास्त मानसिक आणि भौतिक त्रास हा स्त्रीला सहन करावा लागतो. आयुष्याच्या उतरणीला रेवतीही (वर्षा उसगावकर) अचानक अशीच एकटी झाली. आपल्या संसाराचा दुसरा अंक नव्या उमेदीने जगण्याची स्वप्न पाहणाऱ्या रेवतीचा जोडीदार तिला जन्मभर साथ देण्याचं वचन देऊनही अर्धवट वाटेत सोडून गेला. मुलं विदेशात स्थायिक होऊन त्यांच्या त्यांच्या संसारात रमलेली.. एकट्या स्त्रीचं आयुष्य सोपं नसल्याचा अनुभव आता ती पावलोपावली घेत आहे. तिची एकटीची होणारी घालमेल न पाहवून तिची बहीण तिला तिचं नाव एका मॅट्रिमोनियल साईटवर नोंदवायला सांगते. तिचा या वयात घेतलेला निर्णय तिच्या मुलांना रुचेल का? या संभ्रमात रेवती असतानाच तिला सुधीर राजवाडे (तुषार दळवी) यांचं स्थळ येतं.
सुधीर आणि रेवती परस्परांच्या भावना समजून एकमेकांचा स्विकार करतील का? त्यांच्या या निर्णयावर त्यांच्या मुलांची काय प्रतिक्रिया असेल? सुधीर आणि रेवतीच्या मनाचे बंध जुळतील का?
काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'येरे येरे पैसा' या चित्रपटात तुषार दळवी यांनी अभिनय केला होता. एकाच चाळीत सनी आणि बबली राहतात. सनीचे बबलीवर प्रेम असते. चित्रपटाची तिकिटे 'ब्लॅक' करण्याचा सनीचा उद्योग असतो; तर चित्रपटाची 'हिरॉईन' होण्याचे स्वप्न बबली बघत असते. तर दुसरीकडे असे काही योग जुळून येतात की सोशल मिडियासाठी 'प्रॅन्क' करणारा आदित्य व कोट्यवधींची पैसेवसुली करणारा एजंट अण्णा यांची गाठ पडते. दहा कोटींची वसुलीची रक्कम घेऊन जात असलेल्या अण्णाला रस्त्यात आदित्य भेटतो आणि त्यावेळी अण्णाचे पैसे घेऊन भलताच कुणीतरी गायब होतो. अशी या चित्रपटाची कथा होती. या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन संजय जाधव यांचे, पटकथा त्यांच्यासह अरविंद जगताप यांची आणि संवादलेखन अरविंद जगताप यांचे आहे.