उदित आणि आदित्य नारायण दिसणार ह्या कार्यक्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 07:15 IST2018-12-23T07:15:00+5:302018-12-23T07:15:00+5:30

 'कानपूरवाले खुराणाज' या नव्या कौटुंबिक विनोदी मालिकेत जिजा-मेव्हणी यांच्यातील संबंधांवर भर देण्यात आला आहे.

 Udit and Aditya Narayan will appear in this program | उदित आणि आदित्य नारायण दिसणार ह्या कार्यक्रमात

उदित आणि आदित्य नारायण दिसणार ह्या कार्यक्रमात

ठळक मुद्दे 'कानपूरवाले खुराणाज'मध्ये दिसणार उदित आणि आदित्य नारायण

स्टार प्लस वाहिनीवरील 'कानपूरवाले खुराणाज' या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे आणि ते स्वाभाविकही आहे. या मालिकेत एकापेक्षा एक नावाजलेले सेलिब्रिटी कलाकार अतिथी म्हणून सहभागी होत आहेत. नामवंत पार्श्वगायक उदित नारायण आणि त्यांचा गायक-सूत्रसंचालक मुलगा आदित्य नारायण हेही आता सुनील ग्रोव्हरच्या या मालिकेत सहभागी झाले होते आणि त्यांनी या कार्यक्रमात खूप धमाल केली.


या मालिकेशी संबंधित एका सूत्राने सांगितले,' या मालिकेतील ह्या भागाचे चित्रीकरण उदित आणि आदित्य नारायण यांनी नुकतेच पूर्ण केले. त्यानंतर लवकरच आदित्यची आई दीपा नारायण हीसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाली आणि ती आपल्या मुलासाठी नवरीचा शोध घेत होती. गुणवान नारायण कुटुंबियांनी यावेळी आपली मिश्कील
बाजू प्रेक्षकांपुढे आणली आणि प्रेक्षकांना भरपूर हसविले. त्यांना या मालिकेतील उपासना सिंह, सुगंधा मिश्रा आणि अली असगर या मेव्हण्यांनीही यथार्थ साथ दिली.' 
'कानपूरवाले खुराणाज' मालिकेत उदित नारायण आणि आदित्य नारायण या प्रेक्षकांच्या दोन आवडत्या आणि नामवंत गायकांना सहभागी होताना पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. 
 'कानपूरवाले खुराणाज' या नव्या कौटुंबिक विनोदी मालिकेत जिजा-मेव्हणी यांच्यातील संबंधांवर भर देण्यात आला असून २०१८ वर्षाची अखेर या नव्या मालिकेच्या प्रसारणाने होईल. या मालिकेत अनेक विनोदवीर वेळोवेळी सहभागी होणार असून त्यांचे संवाद, प्रसंग आणि नकला यांच्याद्वारे दर आठवड्यास एक नवी संकल्पना मालिकेत सादर केली जाईल. तसेच बॉलीवूडमधील संगीत, चित्रपट आणि अन्य क्षेत्रांतील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी हे या मालिकेत दर आठवड्यास विशेष अतिथीच्या रूपात सहभागी होणार असल्याने मालिकेचा ग्लॅमर आणि मनोरंजनाच्या स्तर खूपच उंचावणार आहे. 'कानपूरवाले खुराणाज' शो दर शनिवार-रविवारी रात्री 9.30 वाजता फक्त स्टार प्लसवर पाहता येणार आहे

Web Title:  Udit and Aditya Narayan will appear in this program