अर्जुनला कळणार अप्पीच्या प्रेग्नंसीचं सत्य; पण बायकोच्या चारित्र्यावरच घेणार संशय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 18:37 IST2023-07-04T18:36:43+5:302023-07-04T18:37:28+5:30
Appi amchi collector: संकल्प, अर्जुनच्या मनात अप्पीविरुद्ध गैरसमज निर्माण करतो

अर्जुनला कळणार अप्पीच्या प्रेग्नंसीचं सत्य; पण बायकोच्या चारित्र्यावरच घेणार संशय?
छोट्या पडद्यावरील अप्पी आमची कलेक्ट ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. अर्जुन आणि अप्पी यांच्या आयुष्यात सध्या अनेक चढउतार येत आहेत. यामध्येच अर्जुनच्या मनात अप्पीविषयी नाराजी आहे. त्यामुळे तो सतत तिला टाळायचा प्रयत्न करत आहे. यामध्येच अप्पीच्या प्रेग्नंसीचं सत्य त्याच्यासमोर येणार आहे. मात्र, संकल्प आणि मनी मावशी चुकीच्या पद्धतीने हे सत्य त्याच्यासमोर आणतात त्यामुळे अर्जुनच्या मनात अप्पीविषयी गैरसमज निर्माण होणार आहे.
अप्पी प्रेग्नंट असल्याचं सत्य केवळ तिला आणि छकुलीला माहित आहे. मात्र, संकल्प अप्पीचा पाठलाग करतो आणि ती कुठे जाते याची माहिती काढतो. त्यावरुन अप्पी प्रेग्नंट असल्याचं त्याच्या लक्षात येतं. यामध्येच तो तिला डॉक्टरांच्या असिस्टंटसोबत बोलताना बघतो आणि याचाच गैरफायदा घेऊन अर्जुनच्या मनात गैरसमज निर्माण करतो.
दरम्यान, आता मनी मावशी आणि संकल्प हे दोघं अर्जुन आणि अप्पीच्या नात्यात दुरावा आणण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे यापुढे या मालिकेत काय होणार? अप्पीविरुद्ध खरोखरच अर्जुनच्या मनात गैरसमज होणार का? अप्पीच्या पोटात असलेलं मूल त्याचंच आहे हे सत्य त्याला कळणार का? हे सारं काही प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावच कळणार आहे.