प्रेग्नंसीच्या तिसऱ्याच महिन्यात झाला होता रुबिनाचा भयानक अपघात; सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 06:00 PM2023-11-29T18:00:25+5:302023-11-29T18:03:08+5:30

Rubina dilaik: एका भीषण अपघातातून रुबिना थोडक्यात बचावली आहे.

tv-rubina-dilaik-revealed-she-had-car-accident-when-she-returned-home-after-third-month-pregnancy-scan | प्रेग्नंसीच्या तिसऱ्याच महिन्यात झाला होता रुबिनाचा भयानक अपघात; सांगितली आपबिती

प्रेग्नंसीच्या तिसऱ्याच महिन्यात झाला होता रुबिनाचा भयानक अपघात; सांगितली आपबिती

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस 14 ची (bigg boss 14) विजेती रुबिना दिलैक (rubina dilaik) लवकरच आई होणार आहे.  काही महिन्यांपूर्वीच रबिनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या प्रेग्नंसीची गोड बातमी चाहत्यांना दिली. सध्या रुबिना तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत असून या दिवसातील तिचे अनुभव शेअर करत आहे. यामध्येच तिने अंगावर काटा आणणारा अनुभव शेअर केला.

अलिकडेच रुबिनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिची आतापर्यंतची प्रेग्नंसी जर्नी कशी होती हे सांगितलं. सोबतच ती जुळ्या बाळांची आई होणार आहे हे सुद्धा तिने यावेळी सांगितलं. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या प्रेग्नंसीच्या तिसऱ्या महिन्यात झालेल्या गंभीर कार अपघाताविषयी देखील खुलासा केला. एका भीषण अपघातातून ती थोडक्यात बचावली आहे.

"जेव्हा आम्हाला कळलं की आम्ही जुळ्या मुलांचे पालक होणार आहोत हे ऐकल्यावर अभिनवला खूप आश्चर्याचा धक्का बसला होता. आम्हाला आनंद झाला होता पण हे खरंय का यावर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे आम्ही गाडीमध्येही एकमेकांशी काहीच बोललो नाही. डॉक्टरांनी मला तीन महिन्यांपर्यंत ही गुडन्यूज कोणालाच न सांगण्याचा सल्ला दिला होता. तीन महिन्यानंतर सोनोग्राफी दरम्यान जुळ्या मुलांना पाहून आम्हाला खूप आनंद झाला", असं रुबिना म्हणाली.

पुढे ती म्हणते,  "सोनाग्राफी झाल्यानंतर मी आणि अभिनव घरी येत होतो. त्यावेळी आमच्या कारचा मोठा अपघात झाला. एका ट्रकची आमच्या कारला मागून धडक बसली. त्यावेळी माझ्या डोक्याला आणि पाठीला धक्का बसला होता. तो अपघात आठवल्यानंतर आजसुद्धा मला भीती वाटते. माझ्यासाठी तो काळ खूपच वाईट होता. त्यानंतर आम्ही पुन्हा इमर्जन्सीमध्ये सोनोग्राफी केली. सुदैवाने दोन्ही बाळं ठीक होती."

दरम्यान, रुबिना आणि अभिनव या जोडीने २०१८ मध्ये लग्न केलं. त्यानंतर ही जोडी बिग बॉस १४ मध्ये झळकली होती. इतकंच नाही तर रुबिना या पर्वाची विजेतीही ठरली.

Web Title: tv-rubina-dilaik-revealed-she-had-car-accident-when-she-returned-home-after-third-month-pregnancy-scan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.