'टीव्ही क्वीन' हिना खाननं गुपचुप उरकलं लग्न? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 08:39 AM2024-04-12T08:39:40+5:302024-04-12T08:43:03+5:30

अभिनेत्री हिना खान हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे.

'TV Queen' Hina Khan got married secretly? Video viral on social media | 'टीव्ही क्वीन' हिना खाननं गुपचुप उरकलं लग्न? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

'टीव्ही क्वीन' हिना खाननं गुपचुप उरकलं लग्न? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

टीव्ही ते चित्रपट असा प्रवास करणारी अभिनेत्री हिना खान हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. मोठा काळ हिना खान हिने मालिकांमध्ये गाजवला आहे. हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. यातच आता हिना खाननं  बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालसोबत गुपचुप लग्न केल्याचं बोललं जात आहे. नुकतेच हिनानं एक पोस्ट शेअर केली आहे. तिचा हा लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हिना खानने नुकतंच तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी लक्ष वेधून घेतलं ते हिनाच्या भांगेत भरलेल्या सिंदूरनं.  हिना खानने भांगात सिंदूर लावलेला दिसून आला. सिंदूर पाहताच हिनानं लग्न केलंय का असा प्रश्न चाहत्यांना पडला. पण,  हिनाचं लग्न झालं नसून तो एक शुटिंगचा गेटअप असल्याचं तिनं सांगितलं. 

व्हिडीओमध्ये हिना म्हणते, 'तुम्हा सर्वांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा, माझा आवाज थोडा खराब येतोय, यासाठी मला माफ करा...मी थोडीशी अस्वस्थ आहे, पण मला तुम्हा सर्वांना ईदच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि हो, माझ्या लग्न झालं नाही. हा माझा शूट गेटअप आहे'. हिनाच्या लव्हलाईफबद्दल बोलायचं झालं तर ती रॉकी जैस्वाल याला बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे. हे कपल सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसून येतात. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचंही बोललं जात आहे. 

Web Title: 'TV Queen' Hina Khan got married secretly? Video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.