Bigg Boss 17 grand finale: जाणून घ्या, किती वाजता होणार सलमान खानची धमाकेदार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 07:26 PM2024-01-28T19:26:30+5:302024-01-28T19:27:04+5:30

Bigg boss 17 grand finale: ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या सोहळ्यात भारती सिंह, ओरी, कृष्णा अभिषेक यांनी हजेरी लावली आहे. मात्र, सलमान कुठेही दिसत नाहीये.

tv-bigg-boss-17-grand-finale-updates-salman khan entry | Bigg Boss 17 grand finale: जाणून घ्या, किती वाजता होणार सलमान खानची धमाकेदार एन्ट्री

Bigg Boss 17 grand finale: जाणून घ्या, किती वाजता होणार सलमान खानची धमाकेदार एन्ट्री

बहुप्रतिक्षीत ठरलेल्या बिग बॉस १७ च्या (bigg boss 17)  ग्रँड फिनाले सोहळ्याला अखेर सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता यंदाच्या पर्वाची ट्रॉफी कोण पटकावणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. या सोहळ्यामध्ये टॉप 5 स्पर्धकांना चिअरअप करण्यासाठी घरातून बाहेर पडलेले स्पर्धक सुद्धा आले आहेत. यामध्येच नुकतीच या कार्यक्रमात प्रसिद्ध कॉमेडिअन भारती सिंह,कृष्णा अभिषेक,ओरी हे सुद्धा सहभागी झाल्याचं दिसून येत आहे. मात्र, प्रेक्षकांचे डोळे बिग बॉसचा सूत्रसंचालक अर्थात सलमान खानकडे लागलं आहे. सलमानची या फिनालेमध्ये कधी एन्ट्री होणार याची सगळे वाट पाहत आहेत.

बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेला नुकतीच सुरुवात झाली आहे. हळूहळू करत या सोहळ्याची रंगत वाढत आहे. परंतु, अजूनही सलमान खान कुठेच दिसत नसल्यामुळे त्याची एन्ट्री कधी होणार याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. सलमान कायमच घरातील स्पर्धकांची कानउघडणी करत असतो. वेळप्रसंगी त्यांच्यासोबत मज्जामस्तीही करतो. त्यामुळे या ग्रँड फिनालेमध्येही त्याची ही झलक पाहायला मिळणार आहे. मात्र, तो नेमका किती वाजता येणार हे नुकतंच समोर आलं आहे.

किती वाजता होणार भाईजानची एन्ट्री?

सलमान खानशिवाय हा शो अपूर्ण आहे. त्यामुळे सहाजिकच या सोहळ्यामध्ये तो सहभागी होणार. सलमानची या ग्रँड फिनालेमध्ये रात्री ९ वाजता एन्ट्री होणार आहे. त्यामुळे सलमान आल्यानंतर या फिनालेमध्ये काय घडतं? विजेत्याची ट्रॉफी तो कोणाच्या हातात देतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: tv-bigg-boss-17-grand-finale-updates-salman khan entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.