जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर ५ महिन्यांतच कामावर परतली टीव्ही अभिनेत्री, म्हणते- "मुलांची आठवण येतेय पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:25 IST2025-04-29T11:25:31+5:302025-04-29T11:25:47+5:30

श्रद्धाने नोव्हेंबर महिन्यात जुळ्या मुलांना जन्म दिला. तिला एक कन्या आणि एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. आता जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर श्रद्धा पुन्हा कामावर परतली आहे. 

tv actress shraddha arya comeback start shooting after 5 months of her delivery | जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर ५ महिन्यांतच कामावर परतली टीव्ही अभिनेत्री, म्हणते- "मुलांची आठवण येतेय पण..."

जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर ५ महिन्यांतच कामावर परतली टीव्ही अभिनेत्री, म्हणते- "मुलांची आठवण येतेय पण..."

टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या काही महिन्यांपूर्वीच आई झाली आहे. श्रद्धाने नोव्हेंबर महिन्यात जुळ्या मुलांना जन्म दिला. तिला एक कन्या आणि एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ही गुडन्यूज तिने चाहत्यांना दिली होती. आता जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर श्रद्धा पुन्हा कामावर परतली आहे. 

श्रद्धाने कुंडली भाग्य मालिकेच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे. प्रेग्नंन्सीमुळे तिने कामातून काही वेळ ब्रेक घेतला होता. मात्र, आता तिने नव्या जोमाने पुन्हा काम सुरू केलं आहे. शूटिंग सुरू केल्यानंतर श्रद्धा म्हणाली, "मी खूप आनंदी आहे. मला कधी असं वाटलंच नाही की मी ब्रेकवर होते. माझी भूमिका प्रीताबाबतही मला वेगळं काही वाटत नाहीये. ते व्यक्तिमत्त्व अजूनही माझ्यात आहे. आणि मला वाटतं हे पात्र आयुष्यभर माझ्यात राहील. पुन्हा सेटवर येऊन खूप छान वाटत आहे. मला माझ्या मुलांची आठवण येतेय. पण, हा सेट, काम, माझ्या आजूबाजूचे लोक, कॅमेरा, भूमिका आणि अॅक्शन...या सगळ्या त्या गोष्टी आहेत. जिथे मला असायला हवं". 


श्रद्धा आर्या हे हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय नाव आहे. 'मै लक्ष्मी तेरे आंगन की' मालिकेतून पदार्पण केलेल्या श्रद्धाने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. 'कुंडली भाग्य' या मालिकेमुळे श्रद्धा प्रसिद्धीझोतात आली. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.  श्रद्धाने १६ नोव्हेंबर २०२१ रोजी राहुल नागलसोबत लग्न करत नव्याने आयुष्याला सुरुवात केली होती. राहुलबरोबर लग्न करण्याआधी श्रद्धाचा साखरपुडा मोडला होता. लग्नानंतर ३ वर्षांनी ते आईबाबा झाले. श्रद्धाने तिच्या लेकीचं नाव सिया तर मुलाचं नाव शौर्य असं ठेवलं आहे.  

Web Title: tv actress shraddha arya comeback start shooting after 5 months of her delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.