दिवाळीच्या मुहुर्तावर टीव्ही अभिनेत्रीने खरेदी केली १.५० कोटींची मर्सिडीज; म्हणते- "सगळे पैसे संपले..."
By कोमल खांबे | Updated: October 19, 2025 11:25 IST2025-10-19T11:24:51+5:302025-10-19T11:25:22+5:30
एका टीव्ही अभिनेत्रीनेही दिवाळीच्या मुहुर्तावर महागडी कार घरी आणली आहे. अभिनेत्रीने मर्सिडीज कंपनीची लक्झरियस कार खरेदी केली आहे. जिची किंमत कोटींच्या घरात आहे.

दिवाळीच्या मुहुर्तावर टीव्ही अभिनेत्रीने खरेदी केली १.५० कोटींची मर्सिडीज; म्हणते- "सगळे पैसे संपले..."
दिवाळीत खरेदीचा मोठा उत्साह असतो. दिवाळीच्या शुभमुहुर्तावर अनेक जण नवी गाडी, घर किंवा इतर वस्तू खरेदी करतात. एका टीव्ही अभिनेत्रीनेही दिवाळीच्या मुहुर्तावर महागडी कार घरी आणली आहे. अभिनेत्रीने मर्सिडीज कंपनीची लक्झरियस कार खरेदी केली आहे. जिची किंमत कोटींच्या घरात आहे. ही अभिनेत्री म्हणजे निया शर्मा आहे.
टीव्ही अभिनेत्री निया शर्माने दिवाळीत मर्सिडीज कार खरेदी केली आहे. नियाने Mercdes Benz AMG CLE 53 ही पिवळ्या रंगाची गाडी खरेदी केली आहे. या ब्रँड मर्सिडीज कारची किंमत सुमारे दीड कोटी इतकी आहे. कार खरेदी केल्यावर नियाने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. "सगळे पैसे गेले. आता EMI सुरू...", असं मजेशीर कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. नियाच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
निया हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. जमाई राजा, एक हजारों मे मेरी बहना है, इश्क मे मरजावा, सुहागन चुडैल, नागिन या मालिकांमध्ये ती झळकली होती. तर खतरों के खिलाडी, लाफ्टर शेफ या रिएलिटी शोमध्येही ती दिसली होती.