९ महिन्याच्या लेकाला घेऊन बीचवर गेली मराठी अभिनेत्री, शेअर केला क्यूट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 15:24 IST2025-11-16T15:24:03+5:302025-11-16T15:24:29+5:30

नेहाचा लेक आता ९ महिन्यांचा झाला आहे. लेकाला घेऊन नेहा पहिल्यांदाच बीचवर गेली आहे. याचा क्यूट व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. 

tv actress neha gadre shared beach video of her 9 month old son | ९ महिन्याच्या लेकाला घेऊन बीचवर गेली मराठी अभिनेत्री, शेअर केला क्यूट व्हिडीओ

९ महिन्याच्या लेकाला घेऊन बीचवर गेली मराठी अभिनेत्री, शेअर केला क्यूट व्हिडीओ

'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री नेहा गद्रे काही महिन्यांपूर्वीच आई झाली. फेब्रुवारी महिन्यात नेहाने तिच्या गोंडस बाळाला जन्म दिला. नेहाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. नेहाचा लेक आता ९ महिन्यांचा झाला आहे. लेकाला घेऊन नेहा पहिल्यांदाच बीचवर गेली आहे. याचा क्यूट व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. 

या व्हिडीओमध्ये दिसतंय की नेहा तिच्या चिमुकल्यासोबत बीचवर वेळ घालवत आहे. तर नेहाच्या मुलालाही समुद्राचं पाणी पायाला लागताच मजा येत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. नेहासोबत तिचा नवराही व्हिडीओत दिसत आहे. हा क्यूट व्हिडिओ पाहून चाहत्यांनी नेहाच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. नेहाने तिच्या लेकाचं नाव इवान असं ठेवलं आहे. "इवानची पहिली बीच ट्रिप", असं कॅप्शन नेहाने या व्हिडीओला दिलं आहे. 


दरम्यान, 'मन उधाण वाऱ्याचे'नंतर नेहा अजूनही चांदरात आहे मालिकेत दिसली होती. मोकळा श्वास, गडबड झाली या सिनेमांतही तिने काम केलं होतं. २०१९ मध्ये नेहाने ईशान बापटसोबत लग्न केलं. लग्नानंतर नेहा नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. परदेशात स्थायिक झाली असली आणि सिनेइंडस्ट्रीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट्स देत असते. 

Web Title : मराठी अभिनेत्री नेहा गडरे का 9 महीने के बेटे के साथ बीच पर मस्ती

Web Summary : 'मन उधाण वाऱ्याचे' से प्रसिद्ध नेहा गडरे ने अपने 9 महीने के बेटे इवान के साथ बीच पर मस्ती करते हुए एक प्यारा वीडियो साझा किया। अभिनेत्री अब विदेश में बस गई हैं, सोशल मीडिया पर प्रशंसकों को अपडेट रखती हैं।

Web Title : Marathi Actress Neha Gadre's Beach Day with Her 9-Month-Old Son

Web Summary : Neha Gadre, famed from 'Man Udhaan Varyache,' shared a sweet video of her 9-month-old son, Ivan, enjoying his first beach trip in Australia with her husband. The actress, now settled abroad, keeps fans updated on social media.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.