टीव्ही अभिनेता मोहम्मद नाजिम लवकरच अडकणार लग्नबंधनात, 9 वर्षापासून आहे नात्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 19:00 IST2019-07-24T18:57:56+5:302019-07-24T19:00:44+5:30

दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की, तो त्याच्या गर्लफ्रेंडला प्रेमाने अद्दू बोलतो कारण तिचे खरे नाव अद्विता आहे. दोघांनीही त्यांच्या लग्नाचे खास प्लॅनिंग केले आहे.

TV actor Mohd Nazim will soon be Engaged | टीव्ही अभिनेता मोहम्मद नाजिम लवकरच अडकणार लग्नबंधनात, 9 वर्षापासून आहे नात्यात

टीव्ही अभिनेता मोहम्मद नाजिम लवकरच अडकणार लग्नबंधनात, 9 वर्षापासून आहे नात्यात


'साथ निभाना साथिया' मालिकेत मोहम्मद नाजिमने मुख्य भूमिका साकारली होती. या भूमिकेने रसिकांची पसंती मिळवली होती. आता नाजिम आपल्या आयुष्यात सेटल होण्याच्या विचाराता आहे. त्यासाठी आता त्याला लग्न करायचे आहे. यावर्षीच्या शेवटी किंवा नवीन वर्षाच्या सुरूवातीला नाजिम लग्न करणार असल्याची माहिती मिळते. नाजिम एस्ट्रोलॉजर शाइना सेठला डेट करत आहे. हे दोघे एकमेकांना गेल्या 9 वर्षापासून एकमेकांना ओळखतात.


दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की, तो त्याच्या गर्लफ्रेंडला प्रेमाने अद्दू  बोलतो कारण तिचे खरे नाव अद्विता आहे. दोघांनीही त्यांच्या लग्नाचे खास प्लॅनिंग केले आहे. लवकरच अद्विताचे आई-वडिल नाजिमला भेटायला येणार आहेत. तेव्हाच रोका सेरिमनी होणार असल्याचे नाजिमने सांगितले. लग्नानंतर अव्दिताला माझ्याकडून कोणत्याही प्रकारचे कसलेच बंधन नसेल. तिला जसे हवे तसे ते तिचे आयुष्य एन्जॉय करू शकते. आमच्या प्रेमात धर्माचे बंधन येऊ नये असे नाजिमने स्पष्ट केले.

विशेष म्हणजे नाजिमचे कुटुंबियही अव्दिताला खूप पसंत करतात. त्यामुळे त्यांनाही तिच्यावर कोणत्याही प्रकारेच बंधन लादणे आवडणार नाही. दोघांचेही कुटुंबिय त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत. खरंतर जेव्हा हे दोघे भेटले तेव्हा त्यांच्या पहिल्या भेटीतच खूप गप्पा रंगल्या होत्या. मात्र तरीही दोघांनी आपले फोन नंबर  एकमेकांना दिले नव्हते. अधुन-मधुन काही निमित्ताने ते एकमेकांना भेटु लागले. जेव्हा नाजिमला अव्दिताला प्रपोज करायचे ठरवले त्याच दिवशी दोघांनी आपले फोन नंबर एकमेकांना दिले होते. तुर्तास दोघांच्या लग्नाची बोलणीही अंतिम टप्प्यात आली असली लग्नाची तारिख अजुन समोर आलेली नाही. 

Web Title: TV actor Mohd Nazim will soon be Engaged