'तुझ्यात जीव रंगला'मधील वहिनीसाहेबांच्या बाळाचे फोटो आले समोर, ठेवले हे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 11:18 IST2021-06-28T11:17:24+5:302021-06-28T11:18:03+5:30

धनश्री काडगावकर हिने इंस्टाग्रामवर बारशाचे फोटो शेअर केले आहेत.

'Tuzyat Jeev Rangala' Vahinisaheb shared post on baby's name ceremony | 'तुझ्यात जीव रंगला'मधील वहिनीसाहेबांच्या बाळाचे फोटो आले समोर, ठेवले हे नाव

'तुझ्यात जीव रंगला'मधील वहिनीसाहेबांच्या बाळाचे फोटो आले समोर, ठेवले हे नाव

छोट्या पडद्यावरील मालिका तुझ्यात जीव रंगलामधील वहिनीसाहेब उर्फ धनश्री काडगावकर हिने काही दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर चाहत्यांची तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ती बऱ्याचदा सोशल मीडियावर बाळाबद्दल चाहत्यांना अपडेट देत होती. मात्र आतापर्यंत बाळाला कुणीच पाहिले नव्हते. अखेर तिने बाळाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बाळाचा बारसा नुकताच पार पडला आणि त्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

धनश्री काडगावकर हिने इंस्टाग्रामवर बारशाचे फोटो शेअर करत लिहिले की, बाळाचं बारसं झालं. नाव ठेवलं "कबीर" कुररररररररररररर....


धनश्री काडगावकरच्या बारशाच्या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. कबीर या नावाला सोशल मीडियावर पसंती मिळते आहे.

धनश्री मुळची पुण्याची आहे. तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर २०१३ मध्ये इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीने लग्न केले होते. धनश्रीला ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ या मालिकांमध्ये झळकली.

विविध नाटक आणि चित्रपटातही धनश्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. ‘झोपी गेलेला जागा झाला’ आणि ‘आधी बसू मग बोलू’ या नाटकांमधून धनश्रीने काम केले आहे.
 

Web Title: 'Tuzyat Jeev Rangala' Vahinisaheb shared post on baby's name ceremony