'तुझ्यात जीव रंगला'मधील वहिनीसाहेबांच्या बोल्ड व ग्लॅमरस फोटोनं उडवली चाहत्यांची झोप, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 15:15 IST2019-08-19T15:15:25+5:302019-08-19T15:15:58+5:30
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाईंना धडा शिकवण्यासाठी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनी म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगावकरला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

'तुझ्यात जीव रंगला'मधील वहिनीसाहेबांच्या बोल्ड व ग्लॅमरस फोटोनं उडवली चाहत्यांची झोप, See Photos
झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाईंना धडा शिकवण्यासाठी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनी म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगावकरला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तिने या मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनंही रसिकांना भुरळ पाडली आहे. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेतच पण धनश्री म्हणजेच नंदिता वहिनीदेखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
धनश्री काडगांवकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना तिचे अपडेट देत असते. मालिकेत साडी व पारंपारिक वेशात दिसली असली तरी ती खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस व बोल्ड आहे. तिचा हा अंदाज सोशल मीडियावर पहायला मिळतो. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूप ग्लॅमरस व बोल्ड दिसते आहे. या फोटोत तिने ब्लॅक अँड व्हाईट पोलका डॉट असलेला जम्पसूट परिधान केला असून त्यावर तिने ब्लॅक रंगाचा व पांढऱ्या रंगाची फ्रेम असलेला गॉगलही घातला आहे. या फोटोत ती खूपच छान दिसते आहे. तिच्या या फोटोंवर छान-छान कमेंट्सचा वर्षाव होत असल्याचं पहायला मिळत आहेत.
धनश्री सध्या फिटनेस फ्रीक झाल्याचेदेखील सोशल मीडियावर पहायला मिळतेय. सोशल मीडियावर तिने तिचे जीममध्ये व्यायाम करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
तुझ्यात जीव रंगला मालिकेत आलेला ट्विस्ट लोकांना चांगलाच आवडतो आहे. या मालिकेत हार्दिक जोशी आता राजा राजगोंडा ही भूमिका साकारत असून त्याची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.
तसेच राजा राजगोंडा वहिनीसाहेबांना केलेल्या चुकांचा धडा शिकविताना दिसणार आहे.