‘येऊ कशी तशी मी नांदायला’चा प्रोमो आला, अखेर ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 18:06 IST2020-12-16T17:57:50+5:302020-12-16T18:06:49+5:30

शूटींग सुरु झालेय. नव्या मालिकाही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. साहजिकच काही जुन्या मालिका यामुळे बंद होणार आहेत.

tuzhat jeev rangala marathi tv serial going off air soon |  ‘येऊ कशी तशी मी नांदायला’चा प्रोमो आला, अखेर ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

 ‘येऊ कशी तशी मी नांदायला’चा प्रोमो आला, अखेर ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

ठळक मुद्दे‘माझ्या नव-याची बायको’ ही बंद होणार, अशी चर्चा यापुर्वी अनेकदा झाली. पण ही मालिका बंद होणार नसून केवळ तिचा वेळ बदलणार आहे.

कोरोना महामारीच्या काळात टीव्हीवरच्या अनेक लोकप्रिय मालिकांना ब्रेक लागला. शूटींग थांबले आणि पाठोपाठ मेकर्सनी जुने एपिसोड दाखवून वेळ निभावली. आताश: शूटींग सुरु झालेय. सोबत नव्या मालिकाही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. साहजिकच काही जुन्या मालिका यामुळे बंद होणार आहेत. झी मराठीवरच्या दोन लोकप्रिय मालिका यामुळे बंद होणार, अशी चर्चा आहे.
 ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या नव्या मालिकेचा प्रोमो सध्या या वाहिनीवर पाहायला मिळतोय.   ही मालिका 4 जानेवारीपासून संध्याकाळी 8 वाजता  प्रसारित होणार असल्याचे या प्रोमोमध्ये म्हटले आहे. 

 आता रात्री 8 म्हणजे, ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेची वेळ. तेव्हा ही मालिका बंद होणार, अशी चर्चा रंगलीय. इतकी लोकप्रिय मालिका बंद होणार म्हटल्यावर चाहत्यांची निराशा होणार, पण खरी बातमी पुढे आहे.

होय, ‘माझ्या नव-याची बायको’ ही मालिका बंद होणार नसून ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपणार असल्याचे कळतेय.

4 वषार्पूर्वी म्हणजेच 3 ऑक्टोबर 2016 रोजी सुरू झालेली ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेला गेल्या 4 वर्षात भरभरून प्रेम मिळाले. राणा व अंजलीच्या प्रेमापासून सुरू झालेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने जबरदस्त टीआरपी मिळवला.

‘माझ्या नव-याची बायको’ही बंद होणार?
‘माझ्या नव-याची बायको’ ही बंद होणार, अशी चर्चा यापुर्वी अनेकदा झाली. पण ही मालिका बंद होणार नसून केवळ तिचा वेळ बदलणार आहे. आता ‘तुझ्यात जीव रंगला’च्या वेळेत ‘माझ्या नवºयाची बायको’ ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
  

Web Title: tuzhat jeev rangala marathi tv serial going off air soon