Tunisha Sharma: 'आम्ही बोलत नाहीय, म्हणून कमजोर समजू नका, लवकरच...'; शिझानच्या बहिणीची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 09:45 PM2022-12-26T21:45:15+5:302022-12-26T21:45:32+5:30

Tunisha Sharma: शिझानच्या बहिणीने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Tunisha Sharma: sheezan's sister has said that we have full faith in India's judicial system, truth will prevail. | Tunisha Sharma: 'आम्ही बोलत नाहीय, म्हणून कमजोर समजू नका, लवकरच...'; शिझानच्या बहिणीची प्रतिक्रिया

Tunisha Sharma: 'आम्ही बोलत नाहीय, म्हणून कमजोर समजू नका, लवकरच...'; शिझानच्या बहिणीची प्रतिक्रिया

googlenewsNext

मुंबई- टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येने मनोरंजनविश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. तिने मालिकेच्या सेटवर गळफास लावून जीवन संपवलं. तुनिषा २० वर्षांची होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलंय. याप्रकरणी वालीव पोलिसांनी तुनिषाचा प्रियकर आणि मालिकेतील तिचा सहकलाकार मोहम्मद शिझान याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. 

शिझानने प्रेमसंबंध तोडल्याने निराश झाल्याने तुनिषाने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने दिली होती. दुपारी शिजान आणि तुनिषा या दोघांनी एकत्र त्याच्या रूममध्ये जेवण केले. त्यानंतर शिझान हा सेटवर शूटिंगसाठी गेला आणि शीजानच्या रूममध्येच तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अली बाबा या टीव्ही शोमध्ये शिझान हा तुनीषाचा सहकलाकार होता. मात्र यादरम्यान शिझानच्या बहिणीने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 

तुनिषा शर्माच्या टॅटूने नेटकऱ्यांचे वेधले लक्ष; पोस्ट होतेय व्हायरल, पण काय लिहिलं होतं?, पाहा

शिझानच्या बहिण म्हणाली की, 'या प्रकरणाची दूसरी बाजू जाणून घेणेही आवश्यक आहे. मात्र आमच्यावर आलेल्या या कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी थोडं एकांतात राहू द्या. दोन्ही कुटुंबे पीडित आहेत. योग्य वेळ येऊ द्या आणि आपण या विषयावर नक्कीच बोलू. पण ही योग्य वेळ नाही. मृत्यू ही खूप वेदनादायक गोष्ट आहे. पीडितेच्या कुटुंबाचा विचार करताना प्रत्येकाने त्यांना एकांतात राहण्याची संधी द्या, असं शिझानची बहिणीने सांगितलं.

निष्पाप मुलाला फसवले जातेय-

शिझानच्या बहिण पुढे म्हणाली की, 'हे खूप दुर्दैवी क्षण आहेत. आम्ही एक मौल्यवान व्यक्ती गमावली आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. शिझानवर अनेक आरोप ठेवण्यात आले असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. पोलिसांना त्यांचे काम करू द्या. कोणताही विचार न करता निष्पाप मुलाला फसवले जात आहे, असे माझे मत आहे. आमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी हा काळ खूप कठीण आहे. मात्र सत्य स्वतःच बाहेर येईल, असं शिझानची बहिणीने सांगितले. 

आमचा भारताच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला आशा आहे की, सत्याचा विजय होईल. मात्र आमचे मौन ही आमची कमजोरी समजू नका. याबाबत आपण लवकरच बोलू. जेव्हा वेळ योग्य असेल. पण सध्या आम्हाला एकांतात राहू द्या, अशी विनंती शिधानच्या बहिणीने केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Tunisha Sharma: sheezan's sister has said that we have full faith in India's judicial system, truth will prevail.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.