Sheezan Khan : "मी निर्दोष आहे... माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास"; तुनिशाच्या मृत्यूवर शीझानची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 11:08 IST2023-01-02T10:59:43+5:302023-01-02T11:08:17+5:30

Sheezan Khan And Tunisha Sharma : तुनिशा शर्माच्या मृत्यूवर शीझान खानने आता पहिली प्रतिक्रिया दिल्याची माहिती समोर आली आहे.

Tunisha Sharma death case ex sheezan khan says he is innocent and faith in judiciary | Sheezan Khan : "मी निर्दोष आहे... माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास"; तुनिशाच्या मृत्यूवर शीझानची पहिली प्रतिक्रिया

Sheezan Khan : "मी निर्दोष आहे... माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास"; तुनिशाच्या मृत्यूवर शीझानची पहिली प्रतिक्रिया

टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने (Tunisha Sharma) शूटिंग सेटवरच गळफास लावून आत्महत्या केल्याने टेलिव्हिजन क्षेत्रात खळबळ माजली आहे. तुनिशाच्या आईने अभिनेता शीझान खानवर (Sheezan Khan) गंभीर आरोप केले आहे. शीझानला कंटाळून तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप आईने केला आहे. तुनिशा तिच्या 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या मालिकेच्या शूटिंगसाठी नायगाव येथील सेटवर पोहोचली. तुनिशाचा को-स्टार शीझानच्या म्हणण्यानुसार, तो दुपारी 3 वाजता त्याच्या मेकअप रूमजवळ पोहचला. तेव्हा रुमचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दार न उघडल्याने त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

तुनिशा शर्माच्या मृत्यूवर शीझान खानने आता पहिली प्रतिक्रिया दिल्याची माहिती समोर आली आहे. "मी निर्दोष आहे... माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास" असं म्हटलं आहे. शीझान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मिश्रा म्हणाले, "वसई, कोर्टात हजर करण्यापूर्वी शीझान खानने त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती, त्यानंतर अभिनेता इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना म्हणाला, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी निर्दोष आहे, सत्यमेव जयते..." तसेच शीझानच्या वकिलाने पुढे म्हटले आहे की, ते सोमवारी कोर्टात जामीन अर्ज सादर करणार आहेत. 

"शीझानने ब्रेकअपच्या दिवशी तुनिशाला मारली थप्पड, बुरख्यासाठी टाकायचा दबाव"

तुनिशाच्या आईने शीझानवर आता गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शीझानला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. तुनिशाने आत्महत्येच्या एक दिवस आधी ख्रिसमस साजरा करण्यासाठी चंदीगडला येण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे ही हत्या असू शकते असं आईने सांगितलं. शीझान बुरखा घालण्यासाठी दबाव टाकत होता. तुनिशाच्या वागण्यात देखील खूप बदल झाला. लग्नाचं वचन दिल्याने तुनिशा मुस्लिम असल्यासारखी राहू लागली होती. त्याच्या आईला अम्मा म्हणायची. शीझानच्या कुटुंबाला भेटल्यानंतर ती माझ्यापासून खूप लांब राहायची. त्याच्या कुटुंबाला तिने आपलं म्हटल्याचं देखील तुनिशाच्या आईने म्हटलं आहे.

"शीझानने ब्रेकअपच्या दिवशी तुनिशाच्या कानशिलात लगावली"

"तुनिशाने सांगितलं होतं की, शीझान सेटवर ड्रग्स घेत होता. जो पर्यंत तुनिशाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शीझानला सोडणार नाही. एकदा शीझानचा फोन तुनिशाने चेक केला होता. तेव्हा तो दुसऱ्याच एका मुलीसोबत बोलत असल्याचं लक्षात आलं. ज्यानंतर दोघांचं भांडण झालं आणि त्याच कारणाने ब्रेकअपही झालं. शीझानने ब्रेकअपच्या दिवशी तुनिशाच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर तिने रडत रडत मला सांगितलं की, शीझानने तिचा वापर केला आहे" असं देखील तुनिशा शर्माच्या आईने म्हटलं आहे. तुनिशा शर्माच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला असून खळबळ उडाली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Tunisha Sharma death case ex sheezan khan says he is innocent and faith in judiciary