अधिपती आणि अक्षराच्या संसाराला सुरुवात झाली खरी; पण मास्तरीणबाईंसमोर भुवनेश्वरीने ठेवली नवी अट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 03:31 PM2023-10-26T15:31:39+5:302023-10-26T15:38:31+5:30

'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील अधिपती आणि अक्षरा या पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे.

Tula shikwin changlach dhada serial episodic | अधिपती आणि अक्षराच्या संसाराला सुरुवात झाली खरी; पण मास्तरीणबाईंसमोर भुवनेश्वरीने ठेवली नवी अट

अधिपती आणि अक्षराच्या संसाराला सुरुवात झाली खरी; पण मास्तरीणबाईंसमोर भुवनेश्वरीने ठेवली नवी अट

 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील अधिपती आणि अक्षरा या पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. ही मालिका आता एका वळणावर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी अक्षरा आणि अधिपती लग्नबंधनात अडकले आहेत. अक्षरा आणि अधिपतीचा नव्या संसाराला सुरुवात झाली आहे. 

अधिपती प्रत्येक पावलावर मास्तरीण बाईंच्या पाठिशी खंबीरपणे उभा दिसतोय. त्याच्या प्रत्येक निर्णयात तिला साथ दिसतोय. आता या मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे.  

आता पर्यंतच्या भागात आपण पाहिले अक्षरा शिक्षण संमेलनाला जाते जिथे कमल तिचा खुप अपमान करतो. ही अशी बाई जी शिक्षणाचे गोडवे तर गाते पण तिने केवळ पैशासाठी अशिक्षित घरात लग्न केलं. नवरा अडाणी आहे ती काय शिक्षण परीषदेत येऊन शिक्षणाचे गोडवे गाणार असं बोलून तिचा पाणउतारा करतो. तर इकडे भुवनेश्वरी अक्षराला बजावून सांगते कि शाळेत शिकवायचं नाही कारण त्या शाळेची तू आता मालकीण आहेस. ह्या भांडणात अधिपती मध्यस्थी करतो आणि भुवनेश्वरी परवानगी देते मात्र ती अक्षरा समोर एक अट ठेवते. ती अट काय असेल व अक्षराला ती अट मान्य करेल का? हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे. 

Web Title: Tula shikwin changlach dhada serial episodic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.