तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये राजशाही थाटात पार पडणार अक्षरा - अधिपतीचा विवाह सोहोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 15:24 IST2023-09-29T15:21:55+5:302023-09-29T15:24:43+5:30

कुटुंबाचा मान राखण्यासाठी अक्षरा अधिपतीसोबत लग्नासाठी तयार होते. दुसरीकडे भुवनेश्वरी खुश आहे कारण अक्षराला अद्दल घडवण्यासाठीच हा सगळा घाट घातला आहे.

tula shikwin changlach dhada serial akshara abhipati wedding episode on 1 october | तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये राजशाही थाटात पार पडणार अक्षरा - अधिपतीचा विवाह सोहोळा

तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये राजशाही थाटात पार पडणार अक्षरा - अधिपतीचा विवाह सोहोळा

प्रेक्षकांनी झी मराठीच्या सोशल मीडिया पेज वर 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेचा १ ऑक्टोबरला होणाऱ्या विशेष भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेत मागच्या काही दिवसांत खूप ट्विस्ट येऊन गेले आणि प्रेक्षकांना ही ते खूप मनोरंजक वाटत आहे. कुटुंबाचा मान राखण्यासाठी अक्षरा अधिपतीसोबत लग्नासाठी तयार होते. दुसरीकडे भुवनेश्वरी खुश आहे कारण अक्षराला अद्दल घडवण्यासाठीच हा सगळा घाट घातला आहे. लग्नातच इरा खोट बोलल्याचं अक्षराला कळणार आहे आणि अक्षराला याचा खूप मोठा धक्का बसणार आहे. आता नियती ही लग्नगाठ बांधेल का ? सगळं खरं कळल्यावर अक्षरा लग्नाला तयार होईल का हे बघणं मनोरंजक ठरणार आहे. 


भुवनेश्वरीने राजशाही घाट घातलाच आहे तर लग्न समारंभ मोठा असणारच.  मालिकेत अक्षरा आणि अधिपतीचा विवाह पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अक्षरा आणि अधिपतीचा लग्नसोहळा खूपच खास असणार आहे. अक्षया आणि अधिपतीच्या लग्नात काय ट्वीस्ट येणार हे आपल्याला लवकरच कळेल. 

झी मराठीच्या मालिकेचे सेट आणि जागा नेहमी सुंदर अशा निवडल्या जातात आणि १ ऑक्टोबरच्या २ तासांच्या विशेष भागात प्रेक्षकांना एक भव्य असा लग्न सोहोळा पाहता येईल. या भागात एक खास सरप्राईझ पण असणार आहे. मालिकेतल्या कलाकारांना हा लग्न विशेष भाग शूट करतांना खूप मजा आली आणि एक वेगळाच उत्साह होता.

 

Web Title: tula shikwin changlach dhada serial akshara abhipati wedding episode on 1 october