'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत नवा ट्विस्ट, अधिपती मास्तरीनं बाईंसमोर देणार प्रेमाची कबुली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 16:31 IST2023-06-15T16:28:01+5:302023-06-15T16:31:03+5:30

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत नवा ट्विस्ट आणि टर्न्स आलेला पाहायला मिळतायेत. आता पुढे काय होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांनाही लागली आहे.

Tula shikvin changalach dhada episodic | 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत नवा ट्विस्ट, अधिपती मास्तरीनं बाईंसमोर देणार प्रेमाची कबुली ?

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत नवा ट्विस्ट, अधिपती मास्तरीनं बाईंसमोर देणार प्रेमाची कबुली ?

झी मराठी वरील "तुला शिकवीन चांगलाच धडा" ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. भुवनेश्वरी, अधिपती आणि अक्षरा ही पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतायत. ह्या मालिकेत प्रेक्षकांनी आतापर्यंत पहिले की अक्षराचं लग्नाच्या दिवशी गुंड अपहरण करतात. तिला वाचण्यासाठी अधिपती आपलं लग्न सोडून जातो. ऐन लग्नाच्या दिवशी अधिपती गायब झाल्यानं भुवनेश्वरीचा राग अनावर होतो. दुसरीकडे अक्षराच्या आई-वडिलांना तिचा होणारा पती कमलचे आई-बाबा नवरी मुलगी जर लग्नाच्यावेळी मंडपात आली नाही तर हे लग्न मोडलं समजा अशी धमकी देतात.  


या मालिकेत रोज काहीतरी नवा ट्विस्ट आणि टर्न्स आलेला पाहायला मिळतो. आता पुढे काय होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांनाही लागली आहे. 

 अधिपती आणि अक्षरा एका बंद खोलीत अडकलेत, या संकटातून सुटण्याची दोघे धडपड करीत आहेत. बंद खोलीतील घुसमट आणि अधिपतीच्या मनातील घुसमट दोन्ही एकाच वेळी व्यक्त होणार का? अधिपती मास्तरीनं बाईंसमोर आपल्या प्रेमाची कबुली देणार का? हे कळल्यावर अक्षरा त्यावर काय उत्तर देणार, अधिपतीच्या प्रेमाचा स्वीकार करणार की नाही हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे. 

Web Title: Tula shikvin changalach dhada episodic