हळद आणि संगीत समारंभातील इशा आणि विक्रांतचा लूक तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 13:01 IST2019-01-08T12:59:02+5:302019-01-08T13:01:37+5:30

विक्रांत आणि इशाचे लग्न धुमधडाक्यात होणार असून त्यांनी लग्न करण्यासाठी भोर हे स्थळ निवडले आहे. लग्नाआधी 11 तारखेला मेहेंदीचा कार्यक्रम होणार आहे तर 12 तारखेला त्यांचा साखरपुडा होणार आहे.

tula pahate re vikrant isha sangeet ceremony photo | हळद आणि संगीत समारंभातील इशा आणि विक्रांतचा लूक तुम्ही पाहिला का?

हळद आणि संगीत समारंभातील इशा आणि विक्रांतचा लूक तुम्ही पाहिला का?

ठळक मुद्देलग्नाआधी 11 तारखेला मेहेंदीचा कार्यक्रम होणार आहे तर 12 तारखेला त्यांचा साखरपुडा होणार आहे. या दोघांच्या हळद, मेहंदी, संगीत समारंभातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधील इशा आणि विक्रांतचा शाही लूक प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे.

छोट्या पडद्यावर सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. इशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. आता या मालिकेला चांगलेच वळण आले असून ही मालिका अधिक रंजक झाली आहे.



 

वय विसरायला लावणारं प्रेम ही संकल्पना असलेली तुला पाहते रे ही मालिका आता एका महत्वपूर्ण टप्प्यावर आली आहे. विक्रांत आणि ईशा या दोघांनीही एकमेकांच्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दोघांची आर्थिक परिस्थिती, राहणीमान आणि वयामध्ये फरक आहे आणि म्हणूनच काही लोकांना त्या दोघांनी एकत्र येणं मान्य नव्हते. त्या दोघांच्या नात्यात दुरावा आणण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. पण आता या सगळ्या परिस्थितीवर मात करत त्या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले आहे. त्या दोघांचे लग्न धुमधडाक्यात होणार असून त्यांनी लग्न करण्यासाठी भोर हे स्थळ निवडले आहे. लग्नाआधी 11 तारखेला मेहेंदीचा कार्यक्रम होणार आहे तर 12 तारखेला त्यांचा साखरपुडा होणार आहे. या दोघांच्या हळद, मेहंदी, संगीत समारंभातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधील इशा आणि विक्रांतचा शाही लूक प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे. तसेच त्यांच्या संगीत सोहळ्यातील व्हिडिओत विक्रांत सरंजामेचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.


 
सध्या सगळीकडे लग्नसराई सुरू आहे. मोठमोठ्या कलाकारांच्या दिमाखदार आणि भव्य लग्नसोहळ्यानंतर आता सगळ्यांना वेध लागले आहेत विकिशा म्हणजेच तुला पाहते रे मधील विक्रांत आणि इशाच्या शाही लग्नसोहळ्याचे. विक्रांत आणि इशा यांचं लग्न हे अगदी अभूतपूर्व असणार आहे. विक्रांतने ईशाला लग्नाची मागणी देखील एका वेगळ्याच पद्धतीने घातली, त्यामुळे त्यांचं लग्न हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. विक्रांत आणि इशा म्हणजेच विकिशाचे लग्न प्रेक्षकांना १३ जानेवारी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे. 

Web Title: tula pahate re vikrant isha sangeet ceremony photo