तुला पाहते रे मधील मायराने म्हणजेच अभिज्ञा भावेने हे फोटो शेअर करत दिला मालिकेच्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 16:12 IST2019-07-01T16:05:39+5:302019-07-01T16:12:27+5:30

तुला पाहते रे या मालिकेतील मायराची भूमिका देखील प्रेक्षकांना चांगलीच आवडते. ही भूमिका मालिकेत अभिज्ञा भावेने साकारली असून या मालिकेचा प्रवास संपल्यानंतर अभिज्ञाने या मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Tula Pahate Re myra aka abhidnya bhave share off sets pictures | तुला पाहते रे मधील मायराने म्हणजेच अभिज्ञा भावेने हे फोटो शेअर करत दिला मालिकेच्या आठवणींना उजाळा

तुला पाहते रे मधील मायराने म्हणजेच अभिज्ञा भावेने हे फोटो शेअर करत दिला मालिकेच्या आठवणींना उजाळा

ठळक मुद्देअभिज्ञाने या मालिकेच्या सेटवरचे तसेच या मालिकेच्या टीमसोबतचे धमाल मस्तीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोला या मालिकेच्या चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तुला पाहते रे ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला खूपच चांगला टिआरपी आहे. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेच्या शेवटच्या भागाचे नुकतेच चित्रीकरण झाले. या मालिकेतील कलाकार अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत काम करत असल्याने त्यांचे एकमेकांसोबत खूपच छान बाँडिंग आहे. ही मालिका संपत असल्याचे वाईट केवळ प्रेक्षकांना नव्हे तर या मालिकेतील कलाकारांना देखील वाटत आहे.

तुला पाहते रे या मालिकेतील मायराची भूमिका देखील प्रेक्षकांना चांगलीच आवडते. ही भूमिका मालिकेत अभिज्ञा भावेने साकारली असून या मालिकेचा प्रवास संपल्यानंतर अभिज्ञाने या मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अभिज्ञाने या मालिकेच्या सेटवरचे तसेच या मालिकेच्या टीमसोबतचे धमाल मस्तीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोला या मालिकेच्या चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तुला पाहते रे या मालिकेत विक्रम सरंजामे ही भूमिका सुबोध भावे साकारत आहे तर ईशा निमकरच्या भूमिकेत गायात्री दातार आहे. या मालिकेत विक्रांतच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच राजनंदिनीची एंट्री झाल्यापासून आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. राजनंदिनी ही भूमिका शिल्पा तुळसकर साकारत असून तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

तुला पाहते रे ही गायत्री दातारची पहिली मालिका असली तरी तिला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. पुण्याच्या गायत्रीने या मालिकेतून प्रमुख भूमिका सादर करत टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. पदार्पणातच तिला सुबोध भावे सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं तिने सोनं केलं.

जुलै महिन्यात तुला पाहते रे ही मालिका संपणार असून या मालिकेच्या कथानकाला आता काही रंगतदार वळणं मिळणार आहेत. या मालिकेची कथा ही येवढीच असल्याने ती ताणण्यात काहीही अर्थ नसल्याने ही मालिका जुलै महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे सुबोध भावेने या काही दिवसांपूर्वी सांगितले होते. 

Web Title: Tula Pahate Re myra aka abhidnya bhave share off sets pictures