"लोक तुझ्याकडे बघतात तेव्हा कसं वाटतं?", कपड्यांवरुन सखींना अभिनेत्रीचा सल्ला, म्हणाली- "आपल्या डिग्निटीची जबाबदारी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:02 IST2025-11-11T11:01:56+5:302025-11-11T11:02:34+5:30
नुकत्याच शेअर केलेल्या रीलमधून ऋचाने मुलींच्या कपड्यांवर भाष्य करत मोलाचा सल्ला दिला आहे.

"लोक तुझ्याकडे बघतात तेव्हा कसं वाटतं?", कपड्यांवरुन सखींना अभिनेत्रीचा सल्ला, म्हणाली- "आपल्या डिग्निटीची जबाबदारी..."
अभिनेत्री ऋचा गायकवाड हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. ऋचाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. ऋचा तिच्या चाहत्यांना अपडेट्स देत असते. त्यासोबतच अनेक रीलही ती करताना दिसते. या रीलमधून ऋचा विविध विषयांवर भाष्य करते. नुकत्याच शेअर केलेल्या रीलमधून ऋचाने मुलींच्या कपड्यांवर भाष्य करत मोलाचा सल्ला दिला आहे.
या रीलमध्ये ऋचा म्हणते, "तुला जे घालायचंय ते घाल...फक्त ना सखी मला एक प्रश्न आहे... जेव्हा तू जे घालतेस आणि लोक तुझ्याकडे जसं बघतात बाहेर गेल्यावर तुला कसं वाटतं? तुला चांगलं वाटतं ते तुझ्या डोळ्यांकडे बघतात, चेहऱ्याकडे बघतात? की तुला तेव्हा चांगलं वाटलं जेव्हा ते अस्वस्थपणे बघतात? तू काहीही घाल लोक बघणारच आहेत. पण, जर आपण त्यांना तेवढा दोष देतोय तर आपल्यावरही आपल्या डिग्निटीची, आपण जसं ड्रेस करतो त्याची जबाबदारी ही स्व: जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे तुला जे घालायचंय ते तू घाल".
ऋचाच्या या रीलवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. दरम्यान, ऋचा 'शेतकरीच नवरा हवा' मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर 'छोट्या बयोची मोठी स्वप्न' या मालिकेत ती दिसली होती. सध्या झी मराठी वाहिनीवरील 'तुला जपणार आहे' मालिकेत ऋचा खलनायिकेची भूमिका साकारत आहे.