"तू मालिकांमध्ये विग लावतेस का?", धनश्री काडगावकरने स्पष्टच सांगितलं, म्हणाली-"गेली अकरा-बारा वर्षे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:45 IST2025-12-26T12:42:18+5:302025-12-26T12:45:53+5:30
"तू विग लावतेस का?", 'त्या' प्रश्नावर धनश्रीने स्पष्ट शब्दांत दिलं उत्तर, म्हणाली-"काही ट्रिटमेन्ट्समुळे..."

"तू मालिकांमध्ये विग लावतेस का?", धनश्री काडगावकरने स्पष्टच सांगितलं, म्हणाली-"गेली अकरा-बारा वर्षे..."
Danashree Kadgaonkar: धनश्री काडगावर (Danashree Kadgaonkar) हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. आजवर तिने 'माझिया प्रियाला प्रित कळेना',' रुंजी', 'जन्मगाठ', 'गंध फुलांचा गेला सांगून' तसेच 'तू चाल पुढं' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेलं वहिनीसाहेब या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मात्र, बराच काळ ही नायिका पडद्यापासून लांब आहे. त्यात आता धनश्री एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.
नुकतीच धनश्रीने 'अभिजात मराठी ओटीटी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला तू बऱ्याचदा मालिकांमध्ये विग लावतेस का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर स्पष्ट शब्दांत उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, "माझ्या आईचे केस अत्यंत जाड,सुंदर आणि लांब असे होते. त्यामुळे माझेही केस तसेच आहेत. हेअर ड्रेसरला माझे केस स्टाईलिंग करत असताना एक-दीड तास जातो. खरंच त्यांनाही त्रास होतो. "
पुढे अभिनेत्री म्हणाली,"खूप जणं मला विचारतात की, मॅम तुम्ही मालिकांमध्ये विग लावत का? तुमचे केस किती जाड आहेत. तर नाही. हे तुम्ही चुकीचं ऐकलेलं आहे.मी विग लावत नाही. मुळात माझे केस खूप जाड आहेत आणि मला त्यांचा आनंद आहे. गेली अकरा-बारा वर्षे मी केस स्टाईलिंग करते आहे आणि नशीबाने माझे केस अजूनही चांगले आहेत. "
त्यानंतर अभिनेत्रीने केसांची निगा कशी राखते, याबद्दल सांगितलं, "मी खरंच सांगते की केसांना ऑयलिंग करणं बरीच वर्ष बंद केलं आहे. पण, ही गोष्ट माझ्या आईकडून आलेली आहे. डाएट, प्रोटिनयुक्त पदार्थ यांनी फरक पडतो. म्हणजे माझ्याबाबतीत असं होतं की, जास्त केस गळती होत नाही. माझे केस गळतात पण परत येतात. मधल्या काळात काही ट्रिटमेन्ट्समुळे खूपच केस गळायला लागले होते. जसं मी पुन्हा जिम चालू करते आणि व्यायाम करते तेव्हा मला फरक जाणवतो. कारण, तेव्हा मी प्रोटिन पावडर घेत असतो. असं असूनही मी त्यावर भयंकर प्रयोग केले आहेत. तरीही याबाबतीत मी नशीबवान आहे. " अशा टिप्स अभिनेत्रीने या मुलाखतीत दिल्या.