दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि राणा दाची ग्रेट भेट, या भेटीमागचं नेमकं कारण काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 16:12 IST2021-05-26T16:10:54+5:302021-05-26T16:12:51+5:30

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका प्रचंड हिट ठरली होती. मालिकेतल्या प्रत्येक कलाकारांचा अंदाज रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला होता. विशेष म्हणजे राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

tujhyat jeev rangala fame actor hardeek joshi meets filmmaker ashutosh gowariker | दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि राणा दाची ग्रेट भेट, या भेटीमागचं नेमकं कारण काय ?

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि राणा दाची ग्रेट भेट, या भेटीमागचं नेमकं कारण काय ?

सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी आपल्या फॅन्ससह संवाद साधतात. त्यांच्यासह आगामी प्रोजेक्ट भूमिका याविषयी गप्पा मारतात. या माध्यमातून रसिकांच्या प्रतिक्रिया थेट जाणून घेता येत असल्याने सेलिब्रिटी सोशल मीडियाला प्राधान्य देतात. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी. आपल्या फॅन्सशी हार्दिक कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट असतो. 

त्याच्याशी निगडीत माहिती फॅन्ससह शेअर करत असतो. शिवाय आपल्या फॅन्ससह काही चांगले विचारही शेअर करत असतो. हार्दिक फिटनेसबाबतही तितकाच सजग आहे. आपल्या फॅन्ससह तो फिटनेस मंत्रा शेअर करतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

या फोटोत हार्दिक जोशी बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत दिसत आहे. आशुतोष गोवारीकर यांच्यासोबतचा हार्दिकच्या फोटोमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. हार्दिक जोशीही बॉलिवूडमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. हार्दिक आणि आशुतोष यांच्या भेटीमागचं कारण समोर आले नसले तरीही आगामी काळात हार्दिक बॉलिवूडमध्ये झळकल्यास आश्चर्य वाटायला नको.

 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका प्रचंड हिट ठरली होती. मालिकेतल्या प्रत्येक कलाकारांचा अंदाज रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला होता. विशेष म्हणजे  राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. पाठकबाई साकारलेली अक्षया देवधरप्रमाणे  राणादा भूमिका हार्दिक जोशीनेही आपल्या अभिनयाने रसिकांची पसंती मिळवली.

मालिकेच्या निमित्ताने "कोल्हापूरची संस्कृती, रांगडी भाषा, कुस्ती परंपरा, शेतकरी वारसा रसिकांना जाणून घेता आला. मालिका बंद झाली तरी मालिकेतले कलाकारांवर आजही रसिक तितकेच प्रेम करतात. त्यांच्याविषयी जाणून घेण्यात आजही प्रचंड उत्सुकता असते. हार्दिकचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. 
  

Web Title: tujhyat jeev rangala fame actor hardeek joshi meets filmmaker ashutosh gowariker