'तू सौभाग्यवती हो' मालिकेत सूर्यभान आणि ऐश्वर्या यांचं रंगणार आगळावेगळा विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 16:23 IST2021-05-24T16:19:15+5:302021-05-24T16:23:06+5:30

छोट्या पडद्यावरील मालिका 'तू सौभाग्यवती हो' अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळू लागली आहे.

tu saubhagyavati ho Latest Track | 'तू सौभाग्यवती हो' मालिकेत सूर्यभान आणि ऐश्वर्या यांचं रंगणार आगळावेगळा विवाहसोहळा

'तू सौभाग्यवती हो' मालिकेत सूर्यभान आणि ऐश्वर्या यांचं रंगणार आगळावेगळा विवाहसोहळा

छोट्या पडद्यावरील मालिका 'तू सौभाग्यवती हो' ही मालिका दिवसेंदिवस रंजक आणि रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आणि मालिकेचे कथानक रसिकांना भावते आहे. छोट्या पडद्यावरील मालिका 'तू सौभाग्यवती हो' अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळू लागली आहे.  गावातली ऐश्वर्या आणि त्याच गावचं प्रस्थ असलेला सूर्यभान यांची ही गोष्ट आहे. ऐश्वर्या  जाधवांची सून कशी होणार आहे आणि त्यापुढे कायकाय घडणार आहे, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

तीर्थयात्रेला गेलेल्या बायजी घरात परत येतात आणि त्यांच्या गैरहजेरीत झालेल्या सर्व गोष्टी त्यांना कळतात. सूर्यभानवर चित्राचा वाढता प्रभाव आणि एकूण परिस्थिती पाहता आपल्यानंतर या घराची आणि सूर्यभानची काळजी घेणारी कोणीतरी घरात यावी, असं बायजींना वाटू लागतं. दरम्यान घरातच राहणारी चुणचुणीत अल्लड पण तेवढीच समंजस असलेल्या ऐश्वर्याकडे त्यांचं लक्ष जातं. गावकऱ्यांच्या रोषापासून वाचवून सूर्यभान तिला घरात आसरा देतो आणि अनेक वर्षं तिचं कुटुंब जाधवांसाठी काम करत असतं.

आता बायजींच्या पुढाकारानी ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा शुभविवाह संपन्न होणार आहे. सूर्यभानचं आधीच एक लग्न झालेलं असून त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. ऐश्वर्याचं लग्न ठरलेलं होत, पण लग्नाच्या आधीच तिच्या होणाऱ्या पतीचा गोळी लागून मृत्यू होतो आणि नियती या दोघांना समोरासमोर आणून उभं करते.अल्लड ऐश्वर्या आणि करारी सूर्यभान या दोघांचा विवाह सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

Web Title: tu saubhagyavati ho Latest Track