'तू सौभाग्यवती हो' या मालिकेतल्या ऐश्वर्याच्या 'लक्ष्मी मंगळसूत्राची' रंगली चर्चा, जाणून घ्या काय आहे खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 14:54 IST2021-06-01T14:50:54+5:302021-06-01T14:54:48+5:30

'तू सौभाग्यवती हो' या मालिकेत सध्या लगीन घाई बघायला मिळत आहे. ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा आगळा वेगळा विवाह सोहळा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Tu Saubhagyavati Ho Aishwarya Unique Laxmi Mangalsutra Design Grabs Attention | 'तू सौभाग्यवती हो' या मालिकेतल्या ऐश्वर्याच्या 'लक्ष्मी मंगळसूत्राची' रंगली चर्चा, जाणून घ्या काय आहे खासियत

'तू सौभाग्यवती हो' या मालिकेतल्या ऐश्वर्याच्या 'लक्ष्मी मंगळसूत्राची' रंगली चर्चा, जाणून घ्या काय आहे खासियत

छोट्या पडद्यावरील मालिका 'तू सौभाग्यवती हो' ही मालिका दिवसेंदिवस रंजक आणि रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आणि मालिकेचे कथानक रसिकांना भावते आहे. छोट्या पडद्यावरील मालिका 'तू सौभाग्यवती हो' अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळू लागली आहे.

 

 

हळद, मेहेंदी, लग्नात होणारे इतर रीतिरिवाज हे सगळं प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नात पाहायला मिळणार आहे. पण सूर्यभान ऐश्वर्याला बायकोचा दर्जा देऊ शकेल का? आणि त्याची मुलं तिला आपली आई मानतील का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे.

'तू सौभाग्यवती हो' या मालिकेत सध्या लगीन घाई बघायला मिळत आहे. ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा आगळा वेगळा विवाह सोहळा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा विवाह सोहळा फक्त आगळा वेगळा नसून भव्यदिव्य पण आहे. जाधव घराण्याला शोभून दिसेल अशा थाटात हे लग्न होणार आहे. आणि या लग्नात सर्वांचं लक्ष वेधून घेतंय ते म्हणजे ऐश्वर्याचं अनोखं मंगळसूत्र. ऐश्वर्या लक्ष्मीच्या पावलांनी जाधव घरात येणार आहे, म्हणूनच की काय ऐश्वर्यासाठी खास लक्ष्मीचं मंगळसूत्र बनवलं गेलं आहे. 

घराची परिस्थिती पाहता आपल्यानंतर या घराची आणि सूर्यभानची काळजी घेणारी कोणीतरी घरात यावी, असं बायजींना वाटू लागतं. दरम्यान घरातच राहणारी चुणचुणीत अल्लड पण तेवढीच समंजस असलेल्या ऐश्वर्याकडे त्यांचं लक्ष जातं. गावकऱ्यांच्या रोषापासून वाचवून सूर्यभान तिला घरात आसरा देतो आणि अनेक वर्षं तिचं कुटुंब जाधवांसाठी काम करत असतं.

आता बायजींच्या पुढाकारानी ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा शुभविवाह संपन्न होणार आहे. सूर्यभानचं आधीच एक लग्न झालेलं असून त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. ऐश्वर्याचं लग्न ठरलेलं होत, पण लग्नाच्या आधीच तिच्या होणाऱ्या पतीचा गोळी लागून मृत्यू होतो आणि नियती या दोघांना समोरासमोर आणून उभं करते. अल्लड ऐश्वर्या आणि करारी सूर्यभान या दोघांचा विवाह सोहळा प्रेक्षकांना 1 जूनपासून पाहायला मिळणार आहे.
 

Web Title: Tu Saubhagyavati Ho Aishwarya Unique Laxmi Mangalsutra Design Grabs Attention