'तू चाल पुढं' मालिकेतील विद्युत लवकरच बांधणार लग्नगाठ, कोण आहे त्याची भावी पत्नी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 12:55 IST2023-10-06T12:54:50+5:302023-10-06T12:55:30+5:30

Tu Chaal Pudha Fame Druva Datar : 'तू चाल पुढं' मालिकेत विक्रम मोहितेची भूमिका अभिनेता ध्रुव दातारने साकारली आहे. ही त्याची पहिलीच मराठी मालिका आहे.

'Tu Chaal Pudhe' serial fame Vidyut will soon tie the knot , who is his future wife? | 'तू चाल पुढं' मालिकेतील विद्युत लवकरच बांधणार लग्नगाठ, कोण आहे त्याची भावी पत्नी?

'तू चाल पुढं' मालिकेतील विद्युत लवकरच बांधणार लग्नगाठ, कोण आहे त्याची भावी पत्नी?

झी मराठी वाहिनीवरील 'तू चाल पुढं' (Tu Chaal Pudha) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील पात्र घराघरात पोहचले आहेत. मालिकेत सध्या अश्विनी तिच्या वाढलेल्या व्यवसायाच्या व्यापामुळे खूपच व्यस्त झालेली आहे. यात तिला आता घरच्यांची देखील साथ मिळत आहे. पण ही तारेवरची कसरत करत असताना तिला वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या प्रवासात विक्रम मोहिते आडकाठी घालत आहे. हाच विक्रम मोहिते (Druva Datar) आता लवकरच खऱ्या आयुष्यात लग्नबेडीत अडकणार आहे.

विक्रम मोहितेची भूमिका अभिनेता ध्रुव दातारने साकारली आहे. ही त्याची पहिलीच मराठी मालिका आहे. त्याआधी तो मॉडेल म्हणून कार्यरत होता. यातूनच त्याला अभिनय क्षेत्रात येण्याची संधी मिळाली होती. दरम्यान ध्रुव लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. १४ मे २०२३ रोजी अक्षता तिखे सोबत त्याने साखरपुडा केला आहे. नुकतेच अक्षताने तिच्या मैत्रिणींसोबत बॅचलर्स पार्टी साजरी केली. ब्राईड टू बी असे कॅप्शन देत अक्षताने तिच्या बॅचलर्स पार्टीचे काही क्षण शेअर केले आहेत. तर काही दिवसांपूर्वीच ध्रुवने देखील त्याच्या खास मित्रांसोबत गोवा ट्रिप एन्जॉय केली. सध्या ध्रुव एक शूट निमित्त रायपूरला गेलेला आहे. तिथले काम आटोपून तो पुन्हा पुण्यात परतला आहे. यानंतर आता तो स्वतःच्या लग्नाच्या तयारीत व्यग्र असणार आहे. 


ध्रुव दातार आणि अक्षता तिखे दोघेही कॉलेज पासूनचे मित्र आहेत. दोघांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. मे महिन्यात त्यांनी साखरपुडा केला आणि आता ऑक्टोबर महिन्यात हे दोघेही विवाहबंधनात अडकताना पाहायला मिळणार आहेत. अक्षता तिखे ही नृत्यांगना आहे. तिने भरतनाट्यमचे धडे गिरवलेले असून आता ती कोरिओग्राफर म्हणून कार्यरत आहे. मेराकी नावाने स्वतःचा डान्स क्लास आहे.

Web Title: 'Tu Chaal Pudhe' serial fame Vidyut will soon tie the knot , who is his future wife?