एक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' रसिकांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 07:15 IST2018-09-25T16:01:34+5:302018-09-26T07:15:00+5:30

मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला असून त्यातून सिद्धार्थ बोडकेची व्यक्तिरेखा आणि तितिक्षाच्या पात्राची त्यावरील प्रतिक्रिया यावरून प्रेक्षकांची मालिकेसाठीची उत्कंठा अजूनच वाढली आहे.

Tu Ashi Javali Raha Tv Series | एक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' रसिकांच्या भेटीला

एक असामान्य प्रेमकथा 'तू अशी जवळी रहा' रसिकांच्या भेटीला

छोट्या पडद्यावर प्रेक्षकांसाठी 'तू अशी जवळी रहा' ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला करणार आहे.या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नावाप्रमाणे ही मालिका एक परिकथेतील प्रेमकथा नसून ही कथा आहे वेड्या प्रेमाची.

मालिकेत सिद्धार्थ बोडके राजवीर मोहिते पाटीलची भूमिका निभावणार आहे जो एक अत्यंत चाणाक्ष मुलगा आहे ज्यालापराभव मान्य नाहीये आणि दुसरीकडे तितिक्षा तावडे ही मनवाची व्यक्तिरेखा साकारणार आहे, जी एक स्वतंत्रआणि स्वावलंबी मुलगी आहे. ही बाकीच्या प्रेमकथांपेक्षा थोडी वेगळी कहाणी आहे. 

एकमेकांच्या विरुद्ध स्वभाव असणारे हे दोघे प्रेमासाठी त्यांची तत्व बाजूला नाही करू शकत. त्यांच्यातील वेगळ्या स्वभावामुळे त्यांच्यासमोर येणाऱ्याआव्हानांभोवती मालिकेचे कथानक फिरणार आहे. ही कथा राजवीरचं मनवावर असलेल्या वेड्या प्रेमाची तर आहेच पण मनवा त्याच्या वेड्या प्रेमाला कसं जिंकणार याने मालिकेला वेगळी कलाटणी मिळणार आहे.

मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला असून त्यातून सिद्धार्थ बोडकेची व्यक्तिरेखा आणि तितिक्षाच्या पात्राची त्यावरील प्रतिक्रिया यावरून प्रेक्षकांची मालिकेसाठीची उत्कंठा अजूनच वाढली आहे.या आव्हानात्मक भूमिकेबद्दलसांगताना तितिक्षा म्हणाली,"या मालिकेतील मनवाची भूमिका ही मी साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. आव्हानात्मक भूमिका नेहमीच आपल्याला चांगलं काम करण्याचा उत्साह देतात. 

एका वेड्या प्रेमाची कथा जीकदाचित आपल्या अवतीभवती देखील असू शकते पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही पण ही मालिका त्याकडेच भर देऊन अशी कथा सगळ्यांसमोर आणू इच्छिते. मी मनवाच्या पात्राशी रिलेट करू शकते.या मालिकेचेकथानक अत्यंत रंजक आहे जे प्रेक्षकांना त्यांच्या टीव्ही स्क्रिनला खिळवून ठेवेल."

Web Title: Tu Ashi Javali Raha Tv Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.