'तू असा जवळी रहा...', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 16:12 IST2022-11-21T16:11:32+5:302022-11-21T16:12:07+5:30

Namrata Sambherao : नम्रता संभेरावचा नवरा योगेश संभेराव याचा आज वाढदिवस असून तिने सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

'Tu Asa javali Raha...', 'Maharashtrachi Hasyajatra' fame Namrata Sambherao's romantic post for her husband | 'तू असा जवळी रहा...', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट

'तू असा जवळी रहा...', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) गाजवणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव (Namrata Sambherao). ती तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवते. तिचे चाहते महाराष्ट्राच्या घराघरात आहेत. ती कधी लॉली  बनून प्रेक्षकांना पोट धरून हसवते तर कधी तिची साधी आईची भूमिकासुद्धा भाव खाऊन जाते. तिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. नम्रता सोशल मीडियावर सक्रीय असून तिथे शेअर केलेल्या पोस्टमुळे ती चर्चेत येत असते. दरम्यान तिचा नवरा योगेश संभेराव याचा आज वाढदिवस असून तिने सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

नम्रता संभेरावने नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा योगी. मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला, तू तुझ्या समजून घे रे लाजणार्‍या या फुला, अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा, तू असा जवळी रहा. हॅप्पी बर्थ डे योगेश.

नम्रताने योगेश संभेराव याच्यासोबत लग्न केले आहे. त्यांना एक मुलगा असून त्याचं नाव रुद्राज आहे. नम्रताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमधून तिच्यातील विनोदी गुणांचं पहिल्यांदा दर्शन झालं. यानंतर तिने कॉमेडीची बुलेट ट्रेन हा शो आपल्या कॉमेडीने गाजवला. यामुळे नम्रताला वेगळी ओळख मिळाली. यानंतरच्या काळात नम्रताने आपल्या अभिनयाची जादू रुपेरी पडद्यावरही दाखवली.

Web Title: 'Tu Asa javali Raha...', 'Maharashtrachi Hasyajatra' fame Namrata Sambherao's romantic post for her husband