'हा ट्रॅप आहे यात अडकू नका...', शुभांगी गोखलेंसोबत घडलेल्या या प्रकारामुळे चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 14:36 IST2021-11-29T14:36:08+5:302021-11-29T14:36:50+5:30

शुभांगी गोखले यांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे.

This is a trap, don't get caught up in it ... ' Shubhangi Gokhale's Facebook account hacked | 'हा ट्रॅप आहे यात अडकू नका...', शुभांगी गोखलेंसोबत घडलेल्या या प्रकारामुळे चाहते झाले हैराण

'हा ट्रॅप आहे यात अडकू नका...', शुभांगी गोखलेंसोबत घडलेल्या या प्रकारामुळे चाहते झाले हैराण

सोशल मीडियावर अनेकदा नावाचा गैरवापर करून फसवणूक केली जाते. अकाउंट हॅक करून पैशांची मागणी, चुकीचे मेसेज केले जातात. त्यामुळे या जाळ्यात अनेकजण ओढले जातात. असाच अनुभव अभिनेत्री शुभांगी गोखले यांना आला आहे. शुभांगी गोखले यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे. ही माहिती खुद्द त्यांनीच सोशल मीडियावर दिली आहे. 

अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी सोशल मीडियावर लिहिले की, पुन्हा एकदा माझे अकाउंट हॅक झाले आहे. माझ्या नकळत सर्वांना मेसेजमध्ये एक लिंक जात आहे. कृपया ती लिंक ओपन करू नका. माझे सायबर सेलसोबत बोलणे सुरू आहे. शुभांगी गोखले यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली. त्यांनी लिहिले की, त्यांच्या अकाउंटवरुन पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर अश्लील फोटो उघडले जात आहेत. हा मेसेज गेले अनेक दिवस फेसबुक मेसेंजर वर फिरतोय. कृपया कुणी तुम्हाला ही लिंक पाठवली तर ओपन करू नका. ओपन केलीत तर तुमच्या प्रोफाईलवरून इतरांना मेसेज जातील.


त्यांनी पुढे म्हटले की, ही एक व्हायरस लिंक आहे. तुम्ही जर क्लिक केलं तर ही लिंक तुम्हाला फेक युट्युब सारख्या दिसणाऱ्या साईटवर घेऊन जाते. जिथे मेसेंजर सारखेच पेज दिसते, तिथे लॉग इन केल्याशिवाय व्हिडिओ दिसणार नाही असे सांगितले जाते…हा ट्रॅप आहे यात अडकू नका. 
दरम्यान, या प्रकरणी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली असून सायबर सेल तपास करत आहेत. 

Web Title: This is a trap, don't get caught up in it ... ' Shubhangi Gokhale's Facebook account hacked