कोण आहे Monaz Mevawalla जी घेणार Taarak Mehtaमध्ये एंट्री, साकारणार 'रोशन भाभीची' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 01:08 PM2023-12-15T13:08:37+5:302023-12-15T13:10:14+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्ही मालिका बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

Tmkoc new roshan sodhi name revealed monaz mevawalla confirms entry as roshan sodhi in tmkoc who is monaz mevawalla | कोण आहे Monaz Mevawalla जी घेणार Taarak Mehtaमध्ये एंट्री, साकारणार 'रोशन भाभीची' भूमिका

कोण आहे Monaz Mevawalla जी घेणार Taarak Mehtaमध्ये एंट्री, साकारणार 'रोशन भाभीची' भूमिका

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्ही मालिका बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आधी कलाकार सोडून गेले, काही कलाकारांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. ही मालिका 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यातील प्रत्येक पात्र लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अलिकेडच या मालिकेवर चाहते चांगलेच संतापले होते बॉयकॉटची मागणी केली होती. याला कारण होते दयाबेनच्या एन्ट्रीसोबतचा ट्रॅक. दयाबेन या शोमध्ये न आल्याने चाहत्यांची निराशा झाली. अशात या मालिकेत आता एक नवी एंट्री होणार आहे.  

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये मिसेस रोशन सोढीची भूमिका जेनिफर मिस्त्रीने पहिल्यांदा साकारली होती. तिने यावर्षी एप्रिल 2023 मध्ये ही मालिका सोडली. आता शोमध्ये तिची जागा मोनाज मेवावाल घेणार आहे. मोनाज याआधी अनेक टीव्ही मालिकेत काम केलं आहे.. मोनाजने 'मीत मिला दे रब्बा' आणि 'रिश्तों की डोंर' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक प्रशिक्षित साल्सा डान्सर देखील आहे.

मोनाज मोवावालाने 2004 साली 'किट्टी पार्टी'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर ती स्टँडअप कॉमेडी शो 'द ग्रेट इंडियन कॉमेडी शो'मध्ये झळकली होती. ती 'सीआयडी', 'एफआयआर' आणि 'सावधान इंडिया'चा भाग आहे. एवढेच नाही तर तिने गुजराती चित्रपटांमध्येही काम केले आहे. यामध्ये ‘हूं मारी बायको ने अनु पती’ (२०१९) सारख्या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. मोनाज मेवावाला सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. 

Web Title: Tmkoc new roshan sodhi name revealed monaz mevawalla confirms entry as roshan sodhi in tmkoc who is monaz mevawalla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.