फोटोतील 'या' चिमुरडींना ओळखलं का? दोन्ही बहिणींनी धरली अभिनयाची वाट, आज आहेत प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 12:40 IST2023-11-14T12:39:50+5:302023-11-14T12:40:30+5:30

दोन अभिनेत्रींचा बालपणीचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. फोटोतील या चिमुरड्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

titeeksha tawde and khushboo tawde childhood photo goes viral on childrens day 2023 | फोटोतील 'या' चिमुरडींना ओळखलं का? दोन्ही बहिणींनी धरली अभिनयाची वाट, आज आहेत प्रसिद्ध अभिनेत्री

फोटोतील 'या' चिमुरडींना ओळखलं का? दोन्ही बहिणींनी धरली अभिनयाची वाट, आज आहेत प्रसिद्ध अभिनेत्री

१४ नोव्हेंबर हा दिवस सर्वत्र बालदिन म्हणून साजरा केला जातो. नेटकऱ्यांप्रमाणे सेलिब्रिटीही या दिवशी त्यांच्या लहानपणीचे फोटो शेअर करताना दिसतात. आपले आवडते कलाकार लहानपणी कसे दिसत असतील याबाबत चाहत्यांनाही उत्सुकता असते. अनेक कलाकारांचे बालपणीचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच दोन अभिनेत्रींचा बालपणीचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. फोटोतील या चिमुरड्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

फोटोत दिसणाऱ्या या चिमुरड्या खऱ्या आयुष्यात सख्ख्या बहिणी आहेत. मराठी कलाविश्वातील दोघीही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. कलाविश्वात करियर करायचं या दोन्ही बहिणींचं आधीच ठरलं होतं. त्यामुळेच त्यांनी अभिनयाची वाट धरली. या दोघींनीही अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या दोघीही झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकरत आहेत. फोटोत दिसणाऱ्या या चिमुकल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नसून खुशबू तावडे आणि तितिक्षा तावडे आहेत. 

सध्या तितिक्षा झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत काम करत आहे. तिने 'सरस्वती', 'तू अशी जवळी राहा' या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 'ज्ञानेश्वर माऊली' या मालिकेतही ती झळकली होती. मराठीप्रमाणेच तितिक्षाने हिंदीमध्येही अभिनयाची छाप पाडली. 'शाब्बास मिठू' या बॉलिवूड चित्रपटात तितिक्षा महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. 

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत उमाची भूमिका साकारणारी खुशबू तावडे हा टीव्ही विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. याआधी ती 'आम्ही दोघी' या मालिकेत दिसली होती. 'आई कुठे काय करते'मध्ये खुशबूची भूमिका लक्षवेधी ठरली होती. 'तेरे बिन' या हिंदी मालिकेतही तिने काम केलं आहे. खुशबूने अभिनेता संग्राम साळवीबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगा आहे. 

Web Title: titeeksha tawde and khushboo tawde childhood photo goes viral on childrens day 2023