टीनाचा कमबॅक?
By Admin | Updated: September 9, 2016 02:08 IST2016-09-09T02:08:26+5:302016-09-09T02:08:26+5:30
‘उतरण’ या मालिकेमुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री टीना दत्ता प्रेक्षकांना लवकरच पुन्हा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

टीनाचा कमबॅक?
‘उतरण’ या मालिकेमुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री टीना दत्ता प्रेक्षकांना लवकरच पुन्हा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. शशी सुमत प्रोडक्शन ‘सरोगसी’ या विषयावर एक मालिका बनवत आहे. ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटासारखी ही मालिका असणार आहे. या मालिकेद्वारे ‘बालिकावधू’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेला सिद्धार्थ शुक्ला छोट्या पडद्यावर परतणार आहे. तसेच जास्मिन बसीनही या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेसाठी टीनाला विचारण्यात आले असून टीना लवकरच या मालिकेचा भाग बनणार असल्याचे म्हटले जात आहे.