"साडे तीन वर्षांचा प्रवास थांबला...", 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील मल्हारची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 09:19 AM2023-11-20T09:19:14+5:302023-11-20T09:19:33+5:30

Sukh Mhanje Nakki Kay Asata: सुख म्हणजे नक्की काय असतंमध्ये जयदीप-गौरीच्या प्रेमकहाणीचा नवा अध्याय सुरु होणार आहे. मालिकेचे कथानक २५ वर्षांनी पुढे सरकले आहे. त्यामुळे या मालिकेत काही नवीन पात्रांची एन्ट्री झाली आहे तर काही पात्रांची एक्झिट.

"Three and a half year journey stopped...",'Sukh Mhanje Nakki Kay Asata' fame Malhar Aka Kapil Honrao post goes viral | "साडे तीन वर्षांचा प्रवास थांबला...", 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील मल्हारची पोस्ट चर्चेत

"साडे तीन वर्षांचा प्रवास थांबला...", 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील मल्हारची पोस्ट चर्चेत

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं(Sukh Mhanje Nakki Kay Asata)मध्ये जयदीप-गौरीच्या प्रेमकहाणीचा नवा अध्याय सुरु होणार आहे. मालिकेचे कथानक २५ वर्षांनी पुढे सरकले आहे. त्यामुळे या मालिकेत काही नवीन पात्रांची एन्ट्री झाली आहे तर काही पात्रांची एक्झिट. यात मल्हार या पात्राचीही एक्झिट झाली आहे. ही भूमिका अभिनेता कपिल होनरावनं साकारली होती. त्याने मालिकेतील प्रवासाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे,

कपिल होनरावने सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील त्याचे फोटो शेअर करत लिहिले की, ९०० प्लसच्या वर एपिसोड, साडे तीन वर्षाचा प्रवास काल थांबला. सुख अजुन काय असत. हया सीरियलने जे सुख मला दिलंय. ते मी शब्दांत मांडू शकणारे नाही. नाव, ओळख , प्रसिद्धी, यश सगळं सगळं ह्या एका मल्हारने कपिलला दिलंय. मल्हार असा इतका साधा माणुस असतो हेच सुरवातीला मला पटत नसे पण हळू हळू त्याचा समजूतदारपणा त्याचं साधेपण, सगळयांर कशाची ही अपेक्षा न ठेवता प्रेम करणे. कमी बोलणं हे नंतर स्क्रीनवर करता करता आवडू लागलं. 

तो पुढे म्हणाला की, मल्हार जरी आत्ता नसला तरी त्याच हे सगळे चांगले गुण कायम आता माझ्यासोबत असतील. तुम्ही प्रेक्षकांनी मला जे भरभरुन प्रेम दिलंय त्याचा मी कायमचा ऋणी असेल. तुमचे लाख लाख आभार. असंच तुमचं प्रेम कायम असू द्या. मला ही संधी दिली त्याबद्दल स्टार प्रवाहचे खूप आभार. कोठारे व्हिजनचे खूप आभार. भेटू लवकरच नवीन रुपात नवीन वेषात. सर्वांचा खूप आभारी आहे. 

Web Title: "Three and a half year journey stopped...",'Sukh Mhanje Nakki Kay Asata' fame Malhar Aka Kapil Honrao post goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.