'सुंदरा मनामध्ये भरली'मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, तिचं आहे निळू फुलेंसोबत हे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 10:32 IST2022-12-20T10:31:41+5:302022-12-20T10:32:38+5:30

Sundara Manamadhye Bharli : 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून नंदिनीच्या पात्राने एक्झिट घेतली आहे आणि नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे.

This famous actress's entry in 'Sundara Manamadhye Bharli' is her connection with Nilu Phule. | 'सुंदरा मनामध्ये भरली'मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, तिचं आहे निळू फुलेंसोबत हे कनेक्शन

'सुंदरा मनामध्ये भरली'मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, तिचं आहे निळू फुलेंसोबत हे कनेक्शन

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरलीने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील अभि आणि लतिकाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. त्या दोघांच्या मदतीला धावून येणारी नंदिनी प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसली. मात्र आता बाय बाय नाशिक म्हणत नंदिनीच्या पात्राने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. नंदिनीचे पात्र अभिनेत्री अदिती द्रविड हिने साकारले होते. गेल्या आठ नऊ महिन्यांपासून ती मालिकेत महत्वाची भूमिका बजावताना दिसली.

एकीकडे अदितीची एक्झिट होत असली तरी आता या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने बऱ्याच वर्षांचा लीप घेतला आहे. या कालावधीत लतीकाच्या आयुष्यात खूप बदल घडून आला आहे. अभिच्या मृत्यू पश्चात लतिका आपल्या लेकीचा सांभाळ करत आहे, मात्र दौलत सारख्या माणसाचा सामना करावा लागत आहे. दौलत आणि सरपंच बाईंच्या अरेरावीला ती तोडीसतोड उत्तर देत असताना मदतीला आता देवा धावून आलेला आहे. देवा सोबत सुरुवातीला लतीकाचे वाद झाले होते. मात्र आपल्या मुलीला सांभाळून घेणारा देवा हळूहळू लतीकाच्या मनात जागा करताना दिसत आहे.

मालिकेत देवाच्या आईची एन्ट्री झाली आहे. देवाची आई म्हणजेच विद्या ताईंची भूमिका गार्गी फुले साकारणार आहेत. गार्गी फुले यांनी तुला पाहते रे मालिकेत काम केले होते. त्यानंतर त्या राजा राणी ची गं जोडी या मालिकेतून बेबी मावशीची भूमिका साकारली होती. या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे, त्यामुळे गार्गी यांना सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत पाहायला मिळत आहे. या नवीन भूमिकेसाठी गार्गी फुले यांनी एक खास गेटअप देखील केला आहे. अभिनेत्री गार्गी फुले या दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्या आहेत. त्यांनी या आधी देखील काही मालिकांमध्ये काम केले आहे.

Web Title: This famous actress's entry in 'Sundara Manamadhye Bharli' is her connection with Nilu Phule.