मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या कपलचं ६ वर्षांनी झालं ब्रेकअप?, यावर अभिनेत्री म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 18:01 IST2023-07-31T18:01:25+5:302023-07-31T18:01:56+5:30
मराठी टेलिव्हिजनवरील हे लोकप्रिय कपल गेल्या ६ वर्षांपासून एकत्र होते.

मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या कपलचं ६ वर्षांनी झालं ब्रेकअप?, यावर अभिनेत्री म्हणाली...
बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) या रिएलिटी शोमधून घराघरात पोहचलेला अभिनेता आदिश वैद्य (Adish Vaidya) गेल्या काही दिवसांपूर्वी त्याच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आला होता. तो लग्नाची बेडी मालिकेतील अभिनेत्री रेवती लेले (Revati Lele) सोबत रिलेशनशीपमध्ये होते. इतकेच नाही तर ते दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असून दोघांच्या कुटुंबियांचीदेखील या नात्याला परवानगी होती. मात्र त्या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं सांगितलं जातंय. ते दोघेही जवळपास सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या नात्याबाबत नुकताच रेवतीने खुलासा केला आहे.
आदिश वैद्यासोबत ब्रेकअपबद्दल रेवती म्हणाली, मला माझ्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा करायची नाही किंवा बोलायचे नाही. हो, काही गोष्टी घडल्या आहेत, मात्र मला माझे आयुष्य सार्वजनिक प्लॅटफॉर्म्सवर खासगी ठेवायचे आहे. ईटाइम्सशी बोलताना रेवतीने सांगितले की, मला याबद्दल डिटेल माहिती सांगायची नाही. प्रसारमाध्यमांमध्ये आमच्याबद्दल बरेच लिहिले जात आहे. पण त्याबद्दल मला टिप्पणी करायची नाही.
रेवती आणि आदिश गेल्या ६ वर्षांपासून होते एकत्र
रेवती सध्या आनंदी असून तिचे कुटुंब आणि मित्र तिला आधार देत आहेत. रेवती आणि आदिश गेल्या ६ वर्षांपासून एकत्र होते. ते बऱ्याचदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत होते.
रेवती लेलेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने लग्नाची बेडी मालिकेत मधुची भूमिका साकारली आहे. याशिवाय तिने स्वामिनी मालिकेत रमाची भूमिका बजावली होती. तर आदिशबद्दल सांगायचंं तर बिग बॉस मराठीमधून त्याला खरी लोकप्रियता मिळाली. त्याने मराठीसह हिंदी मालिकेत काम केले आहे. त्याने रात्रीस खेळ चाले मालिकेतही काम केले होते.