'मुंबई पुणे मुंबई-३'मधील ही अभिनेत्री झळकणार 'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 15:52 IST2023-04-11T15:51:36+5:302023-04-11T15:52:04+5:30

'कारण गुन्ह्याला माफी नाही' ही मालिका १ मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

This actress from 'Mumbai Pune Mumbai-3' will be seen in the serial 'Karaan Karunila Mafi Nai' | 'मुंबई पुणे मुंबई-३'मधील ही अभिनेत्री झळकणार 'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत

'मुंबई पुणे मुंबई-३'मधील ही अभिनेत्री झळकणार 'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत

'गोठ', 'श्रीमंताघरची सून' या मालिका आणि 'मुंबई पुणे मुंबई ३' या सिनेमातून अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झालेली रूपल नंद (Rupal Nand) आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या नव्या मालिकेतून रूपल नंद प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यात रूपलची नवी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी निरनिराळ्या मालिकांमधून विशेष व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रूपल नेहमीच मग्न असते. आता ती एका नव्या रूपात नव्या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना आपल्याला दिसणार आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे.

पोलीस आपल्या कामात नेहमी तत्पर असतात. दिवस-रात्र आपल्या कामाला महत्त्व देतात. आपल्या कुटुंबासाठी द्यायला पुरेसा वेळ त्यांच्याकडे नसतो. आपल्या कामाला नेहमी प्राधान्य देतात. अशाच प्रकारची विशिष्ट व्यक्तिरेखा या मालिकेतून आपल्याला पुन्हा भेटणार आहे, ती म्हणजे इन्स्पेक्टर भोसले. आपल्या कामात नेहमी तत्पर असणारे इन्स्पेक्टर विजय भोसले यांच्या आयुष्यातील दुसरी बाजू,  ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’! मालिकेतून उलगडणार आहे. याव्यतिरिक्त अश्विनी कासारही या मालिकेतून पोलीस निरीक्षकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १ मेपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता ही मालिका सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत असून प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबद्दल फार कुतूहल आहे.


'गोठ' या मालिकेतून राधा ही भूमिका साकारात रूपल नंदने छोट्या पडद्यावर आली. या मालिकेतील तिची भूमिका खूप गाजली. अन्यायाविरोधात आवाज उठवणारी मुलगी अशी तिची भूमिका होती. त्यानंतर 'श्रीमंताघरची सून' या मालिकेतील अनन्या या भूमिकेलाही रूपलने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. 'मुंबई पुणे मुंबई' या सिनेमाच्या तिसऱ्या भागामध्ये रूपलने साकारलेली मुक्ता बर्वेच्या बहिणीची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली. मोजक्या भूमिका करून रूपलने मनोरंजनविश्वात तिचा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Web Title: This actress from 'Mumbai Pune Mumbai-3' will be seen in the serial 'Karaan Karunila Mafi Nai'