'आई कुठे काय करते'मधील या कलाकारानं सुरू केला स्वतःचा व्यवसाय, चाहते करताहेत कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 07:00 IST2023-06-18T07:00:00+5:302023-06-18T07:00:01+5:30

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतून कलाकार घराघरात पोहचले. या मालिकेतील कलाकार सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात.

This actor from 'Aai Kuthe Kay Karte' started his own business, fans appreciate it | 'आई कुठे काय करते'मधील या कलाकारानं सुरू केला स्वतःचा व्यवसाय, चाहते करताहेत कौतुक

'आई कुठे काय करते'मधील या कलाकारानं सुरू केला स्वतःचा व्यवसाय, चाहते करताहेत कौतुक

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतून कलाकार घराघरात पोहचले. या मालिकेतील कलाकार सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. दरम्यान आता या मालिकेतील अभिषेकची भूमिका साकारणारा अभिनेता निरंजन कुलकर्णी चर्चेत आला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो चहा बनवताना दिसत आहे. 

निरंजन कुलकर्णी याने स्वतःचं एक दुकान टाकल्याचं समजते आहे. हे दुकान सँडविचचं असल्याचे दिसतंय. निरंजनने त्याच्या दुकानाचे नाव ‘बडीज सँडविच’ असं ठेवलं आहे. त्याच्या या दुकानामध्ये चहा, सँडविच, ज्यूस अशा प्रकारचे विविध मेनू आहेत. पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये निरंजन चहा बनवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत निरंजनने कॅप्शनमध्ये लिहिले की, रिमझिम पाऊस आणि माझ्या हातचा चहा कधी येताय प्यायला?. त्याच्या या पोस्टला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. 

चाहते करताहेत कमेंट्सचा वर्षाव
निरंजनच्या हातचा चहा पिण्यासाठी अनेक चाहते उत्सुक आहेत. निरंजनच्या पोस्टला कमेंट करत चाहते म्हणत आहेत की, सोबत तुझ्या गोड गप्पापण हव्यात. अरे वाह यायला पाहिजे. अभिनंदन तुझं. अशा अनेक कमेंट निरंजनला आल्या आहेत. 

मालिकेचं अपडेट..
आई कुठे काय करते मालिकेत सध्या वेगळ्याच वळणावर आली आहे. आशुतोष केळकरांची बहीण वीणा केळकर हिला कुणीतरी त्रास देत आहे. परंतु हे प्रकरण नेमकं काय आहे हे विनाने अजून कोणालाच सांगितलेलं नाही. अशातचं अभी आणि अनघामध्ये जानकीला वाढदिवसाला कोण घेऊन जाणार यावरून थोडे खटके उडल्याचे पहायला मिळत आहे. 

Web Title: This actor from 'Aai Kuthe Kay Karte' started his own business, fans appreciate it