अमृता देशमुख-प्रसाद जवादे लवकरच बांधणार लग्नगाठ, केळवणाला झाली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 05:18 PM2023-09-02T17:18:27+5:302023-09-02T17:18:58+5:30

सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहत आहेत. काही कलाकारांचा साखरपुडा पार पडला तर काहींनी नात्याची कबुली दिली. अशीच मराठी कलाविश्वातील एक जोडी लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.

This actor couple of Marathi cine industry will tie the knot soon, the excitement has started | अमृता देशमुख-प्रसाद जवादे लवकरच बांधणार लग्नगाठ, केळवणाला झाली सुरुवात

अमृता देशमुख-प्रसाद जवादे लवकरच बांधणार लग्नगाठ, केळवणाला झाली सुरुवात

googlenewsNext

सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहत आहेत. काही कलाकारांचा साखरपुडा पार पडला तर काहींनी नात्याची कबुली दिली. अशीच मराठी कलाविश्वातील एक जोडी लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. ही जोडी म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे.  या दोघांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत साखरपुड्याची घोषणा केली होती. प्रसाद-अमृतामध्ये ‘बिग बॉस’च्या घरात घट्ट मैत्री झाल्याचे पाहायला मिळाले होते. २२ जुलैला दोघांनीही गुपचूप साखरपुडा केला आणि फोटो शेअर करत लग्नाच्या तारखेची घोषणा केली. दरम्यान आता त्यांच्या केळवणालाही सुरुवात झाली आहे.

अभिनेत्री अमृता देशमुखने इंस्टाग्राम स्टोरीवर तिचा आणि प्रसाद जवादेचा फोटो शेअर करत लिहिले की, पहिलं केळवणासाठी तयार आहोत. या फोटोत दोघांनी क्रिम रंगाचं आउटफिट घातले आहे. त्यांच्या लग्नाला काही महिने शिल्लक असल्यामुळे आता त्यांच्या केळवणाला सुरुवात झाली आहे. 

बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. बिग बॉसनंतरही अमृता आणि प्रसाद एकमेकांना डेट करत होते. अनेकदा ते सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसायचे. काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रेमाची कबुली देत साखरपुडा केल्याची माहिती दिली होती. याबरोबरच त्यांनी लग्न करणार असल्याचंही सांगितले. अमृता आणि प्रसाद १८ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत.

Web Title: This actor couple of Marathi cine industry will tie the knot soon, the excitement has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.