Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’ मध्ये दिसणार हे कलाकार? एक नाव वाचून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 16:06 IST2022-08-08T16:03:49+5:302022-08-08T16:06:46+5:30
Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’ कोण होस्ट करणार, यावरचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. पण हो, या सीझनमध्ये कोण कोण कलाकार सामील होणार, याची एक संभाव्य यादी मात्र समोर आली आहे.

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’ मध्ये दिसणार हे कलाकार? एक नाव वाचून बसेल धक्का
Bigg Boss Marathi 4: तिकडे बिग बॉसचा 16 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि इकडे ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनची तयारी सुरू झालीये. होय, ‘बिग बॉस मराठी 4’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या हा शो चांगलाच चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी 4’ कोण होस्ट करणार, यावरचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. पण हो, या सीझनमध्ये कोण कोण कलाकार सामील होणार, याची एक संभाव्य यादी मात्र समोर आली आहे.
या यादीतली काही नावं ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या यादीत अनेक मोठ्या व लोकप्रिय कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. काही अनपेक्षित नावं यात आहेत. एक असंच अनपेक्षित नाव आहे दिग्गज अभिनेत्री अलका कुबल यांचं.
होय, ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये अलका कुबल स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकतात. आता यात किती तथ्य आहे, हे लवकर कळेलच. पण अलका कुबल यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
‘बिग बॉस मराठी 4’च्या संभाव्य कलाकारांच्या यादीतील आणखी एक अनपेक्षित असं नाव आहे शुभांगी गोखले यांचे. मराठी चित्रपट आणि मालिका विश्वात आपल्या दमदार अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शुभांगी गोखले या सुद्धा ‘बिग बॉस मराठी 4’च्या स्पर्धक असतील, अशी चर्चा आहे.
या नावांचीही चर्चा
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी सुद्धा ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये दिसणार असल्याची शक्यता आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही देखील बिग बॉसमध्ये सहभागी होऊ शकते असं बोललं जात आहे. सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत राहणारे अभिनेते किरण माने यांचं नावही या यादीत आहे. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे ते चांगलेच प्रसिद्धीझोतात आले होते.
‘देवमाणूस’ फेम अभिनेत्री नेहा खान, अभिनेत्री सोनल पवार शिवाय ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम् अभिनेत्री रुचिरा जाधव यादेखील ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये सहभागी होणार असल्याचे बोललं जात आहे. अभिनेत्री शर्वरी लोहकरेचं नावही या यादीत आहे.
अभिनेत्री दीप्ती लेले, ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेता ओमप्रकाश शिंदे इतकंच नाही तर ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील ‘अण्णा नाईक’ अर्थात अभिनेते माधव अभ्यंकर हे देखील‘बिग बॉस मराठी 4’मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.
‘फुलपाखरू’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता यशोमन आपटे याच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. ‘लागिरं झालं जी’ मालिकेत झळकलेला अभिनेता निखिल चव्हाण याचे नावही बिग बॉसच्या संभाव्य यादीत पाहायला मिळत आहे.