‘निम्की मुखिया’मालिकेतील या कलाकारांनी दिली प्रेमात असल्याची कबुली,एकमेकांसोबत असा घालवतात वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 07:19 AM2017-12-05T07:19:05+5:302017-12-05T13:21:56+5:30

‘निम्की मुखिया’ मालिकेची नायिका भूमिका गुरुंग सध्या ग्लॅमजगताचा अनुभव घेत असून त्यात तिचे वैयक्तिक जीवनही खाजगी राहात नाही,कलाकार त्यांच्या ...

These artists in 'Dikki Mukhiya' confess that they are in love, spending time together with each other! | ‘निम्की मुखिया’मालिकेतील या कलाकारांनी दिली प्रेमात असल्याची कबुली,एकमेकांसोबत असा घालवतात वेळ!

‘निम्की मुखिया’मालिकेतील या कलाकारांनी दिली प्रेमात असल्याची कबुली,एकमेकांसोबत असा घालवतात वेळ!

googlenewsNext

/>‘निम्की मुखिया’ मालिकेची नायिका भूमिका गुरुंग सध्या ग्लॅमजगताचा अनुभव घेत असून त्यात तिचे वैयक्तिक जीवनही खाजगी राहात नाही,कलाकार त्यांच्या खाजगी आयुष्यात काय काय करतात हे जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. त्यामुळे भूमिकालाही सध्या तिचे चाहते वेगवेगळ्या गोष्टींवर अनेक प्रश्न विचारत असतात.सध्या भूमिका गुरूंग एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. भूमिका अभिनेता अमितसिंह सोबतचा हा फोटो आहे.खुद्द भूमिकानेचा हा फोटो शेअर करत एक सुंदर कॅप्शन दिली आहे.भूमिका अमितसिंहच्या प्रेमात पडल्याचे साक्ष तिचे हे फोटो देत असल्याचे पाहायला मिळत आहे. भूमिकाच्या या प्रेमप्रकरणाची सारी माहिती या मालिकेच्या सर्व कर्मचारी आणि कलाकारांनाही आहे. कीथी भूमिकेने अमितसिंह लोकप्रिय आहे.या प्रेमप्रकरणाची भरपूर चर्चा झाल्यावर भूमिकाने आता अधिकृतरीत्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे.याविषयी भूमिकाने सांगितले की,“हो,आम्ही एकमेकांच्या प्रेमात असून गेली चार वर्षं आमचं प्रेमप्रकरण सुरू आहे.आता येत्या महिन्यात आम्ही अॅनिव्हर्सरीही साजरी करणार आहोत.”असे तिने सांगितले.आपल्या या प्रेमजीवनाविषयी पुढे भूमिका सांगते,“अभिनयाच्या क्षेत्रात सर्वजण त्याला प्रेमाने कीथी म्हणून ओळखतात.तो सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करतो. प्रभुदेवा, बॉस्को-सीझर आणि अशाच बड्या नृत्यदिग्दर्शकांच्या हाताखाली त्याने काम केलं आहे.अर्जुन रामपालची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डॅडी’ चित्रपटात त्याने नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तो अभिनयही करतो.” निम्कीने त्याच्याशी झालेल्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली, “एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून आमची ओळख झाली.तेव्हा माझा अभिनयाच्या क्षेत्राशी काहीही संबंध नव्हता.“मी त्याच्या प्रेमात पडले कारण एक माणूस म्हणून तो चांगला असल्याचे मला जाणवलं.तो खूप प्रेमळ आहे.सगळ्यांची खूप काळजी घेतो.मुळात त्याला पाहताक्षणी मी त्याच्या प्रेमात पडले होते.त्यानंतर आमची मैत्री झाली.आम्ही दरवेळी वेगवेळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटायचो. आमच्या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. मला तो आधीपासूनच आवडायचा मात्र नंतर त्यालाही मी आवडू लागले.आम्ही दोघेही मनापासून एकमेकांवर प्रेम करतो.चार वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखतोय.त्यामुळे आता आमचे नाते आम्हाला कोणाशीही लपवायचे नाही.आमच्या अॅनिव्हर्सरीचा दिवस कसा साजरा करणार याविषयी तिने खास प्लॅनिंग केले आहेत. ती म्हणाली,“यंदा त्याने माझ्यासाठी काही खास सरप्राईज द्यावे असे मी त्याला सांगितले आहे.एरवी तो दिवस कसा साजरा करायचा,हे मीच ठरवते.आता यंदा पाहूया तो काय करतो…” आता पर्यंत आमच्या नात्याविषयी आजपर्यंत उघडपणे कुठेही बोलले नाही.कारण त्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष माझ्या व्यावसायिक कामावरून विचलित होऊन ते माझ्या खाजगी जीवनाभोवती केंद्रित होणार या गोष्टीमुळे आम्ही आमच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती.आता ती योग्य वेळ वाटली त्यामुळे पहिल्यांदाच या गोष्टी शेअर केल्या आहेत.लवकरात लवकर आम्ही रेशीगाठीत अडकावे अशी माझी इच्छा आहे असेही तिने सांगितले.

Web Title: These artists in 'Dikki Mukhiya' confess that they are in love, spending time together with each other!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.