हे आहेत 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील खरे खुनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2016 15:06 IST2016-10-08T15:06:29+5:302016-10-08T15:06:29+5:30

'रात्रीस खेळ चाले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, याची माहिती  आम्ही तुम्हाला नुकतीच दिली होती. मात्र या ...

These are 'play games in the night' genuine murderers in the series | हे आहेत 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील खरे खुनी

हे आहेत 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील खरे खुनी

'
;रात्रीस खेळ चाले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, याची माहिती  आम्ही तुम्हाला नुकतीच दिली होती. मात्र या मालिकेतील गूढ नेमके काय, खुनी कोण ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना अद्यापही मिळाली नसून मालिकेता शेवट नेमका कसा होणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. नेने वकील आणि अजय यांचा खरा खुनी कोण याबाबतची उत्सुकता ताणली गेली असून शेवटच्या भागापर्यंत हे गुपित दडवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी केला. मात्र मालिकेचे रहस्य आता उलगडले असून ख-या खुन्याचा शोधही लागला आहे. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानची काही छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्या छायाचित्रांत पोलीस माधवाची बायको निलीमा व सुषमा उर्फ सुशल्या या दोघींच्या हातात बेड्या घालून नेताना दिसत आहेत. त्यामुळे या दोघीच अजय व नेने वकील यांच्या खुनी असल्याचे दिसत आहे. कोणत्या कारणामुळे निलीमा व सुषमाने त्या दोघांचा खून केला हे अद्याप स्पष्ट झालेले नसून येत्या काही भागांतच या प्रश्नांचाही उलगडा  होणार आहे.

Web Title: These are 'play games in the night' genuine murderers in the series